राळेगावात कमी दाबाची वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 05:00 AM2020-05-20T05:00:00+5:302020-05-20T05:00:19+5:30

यासंदर्भात विद्युत कंपनीचे येथील उपकार्यकारी अभियंता म्हणाले, यवतमाळ-राळेगाव मार्गातील वीज वाहिनीत अनेक ठिकाणी इतरत्रही वीज दिली जात आहे. कळंब, कोठा येथे वीज पुरवठा केला जातो. राळेगावनंतर झाडगाव, वाढोणापर्यंतही एकाच वीज वाहिनीवरून वीज पुरवठा होतो. ठिकठिकाणी तुकडे पडत असल्याने त्याचा परिणाम वीज दाबावर होत आहे.

Low pressure electricity in Ralegaon | राळेगावात कमी दाबाची वीज

राळेगावात कमी दाबाची वीज

Next
ठळक मुद्देउपकरणे बंद : वीज जाण्याचे प्रमाणही वाढले, नागरिकांना उकाड्यात काढावे लागताहेत दिवस

लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : शहरातील अनेक भागात कमी दाबाचा वीज पुरवठा होत आहे. यामुळे महागडी वीज उपकरणे पूर्ण क्षमतेने काम करत नाही. अनेक ठिकाणी पाण्याच्या मोटारी पाणी ओढू शकत नाही. कुलर, पंखे वेग घेत नाही. जादा वॅटच्या बल्बचा प्रकाश परिपूर्ण उजेड देत नाही. काहींची वीज उपकरणे बंद पडणे, निकामी होण्याचे प्रमाण वाढले आहे.
नगरपंचायतीच्या कळमनेर येथील एक्सप्रेस फिडरला सतत व पूर्ण दाबाची वीज मिळत नसल्याने त्याचा परिणाम येथील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. वडकीसह ग्रामीण भागात याचे प्रमाण वाढले आहे. कधी वीज बंद, कधी वीज फेल यामुळे बँक ग्राहकांना भर उन्हाळ्यात तासन् तास नंबरच्या प्रतीक्षेत घालविण्याच्या घटना या महिन्यात अनेकदा घडल्या आहे.
यासंदर्भात विद्युत कंपनीचे येथील उपकार्यकारी अभियंता म्हणाले, यवतमाळ-राळेगाव मार्गातील वीज वाहिनीत अनेक ठिकाणी इतरत्रही वीज दिली जात आहे. कळंब, कोठा येथे वीज पुरवठा केला जातो. राळेगावनंतर झाडगाव, वाढोणापर्यंतही एकाच वीज वाहिनीवरून वीज पुरवठा होतो. ठिकठिकाणी तुकडे पडत असल्याने त्याचा परिणाम वीज दाबावर होत आहे. यवतमाळ ते राळेगाव सरळ वीज पुरवठा असता किंवा १३२ केव्ही स्टेशन पूर्णत्वास येवून कार्यान्वित झाले असते तर वीज ग्राहकांकरिता सुविधेचे झाले असते, असे ते म्हणाले.

१३२ केव्ही उपकेंद्र अपूर्ण
सन २०१८ च्या डिसेंबरमध्ये बरडगाव येथील १३२ केव्ही सबस्टेशन पूर्णत्वास जावून या भागातील नागरिकांच्या वीज तुटवड्याची परिपूर्ण गरज भागविली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली होती. सुरुवातीला नाशिकच्या ठेकेदाराने या सबस्टेशनच्या उभारणीत कालापव्यय केला, हलगर्जी केली. त्यानंतर हे सबस्टेशन वीज विभागाद्वारे चार्जींगकरिताही धिम्या गतीने कार्य करीत राहिले. २५ मे रोजी संपूर्ण कामे आटोपून लोकार्पणाची प्रतीक्षा असताना असता लॉकडाऊनमुळे विलंब लागणार असे सांगण्यात येत आहे. जून अखेरपर्यंतही पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने यावर्षीसुद्धा नागरिकांना दरवर्षीप्रमाणे विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. १५० कोटी रुपये खर्चाचे हे सबस्टेशनच लपंडाव करीत आहे.

Web Title: Low pressure electricity in Ralegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज