शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नजर अंदाज आणेवारी ५५ पैसे

By admin | Updated: November 6, 2014 02:21 IST

पुसद तालुक्यात गतवर्षीपेक्षाही पिकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. असे असताना प्रशासनाने नवाच जावईशोध लावत नजर अंदाज आणेवारी ५५ पैसे दर्शविली आहे.

पुसद : पुसद तालुक्यात गतवर्षीपेक्षाही पिकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. असे असताना प्रशासनाने नवाच जावईशोध लावत नजर अंदाज आणेवारी ५५ पैसे दर्शविली आहे. आणेवारी अधिक दर्शवून प्रशासनाने शेतकऱ्यांना आणखी दुबळे बनविल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गात उमटत आहे. सुधारित आणेवारी घोषित करून पुसद तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, त्याबरोबरच शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करण्याची मागणी होत आहे. तालुक्यात पिकांची स्थिती मागील वर्षाच्या तुलनेत २५ टक्केसुद्धा नाही. प्रशासनाने नुकतीच नजर अंदाज आणेवारी घोषित केली. त्यामध्ये ती ५५ टक्के एवढी दर्शविण्यात आली. शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित ठेवण्याचा हा प्रशासनाचा डाव आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा सर्वे करून सुधारित नजर अंदाज आणेवारी घोषित करावी, त्यामध्ये ही आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी राहणार असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी निघाल्यास तालुका दुष्काळग्रस्त घोषित होवू शकतो. परिणामी शेतकऱ्यांनाही विविध योजना आणि कर्ज माफीचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे प्रशासनाने ५५ पैसे आणेवारी काढून मदतीची आशा धुसर केली आहे. परिणामी या आणेवारी संदर्भात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष उफाळला आहे. दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले. त्यानंतर वातावरणातील बदल आणि उन्हाचा तडाखा यामुळे सोयाबीन आणि कपाशीची उतारी आली नाही. उत्पादनात मोठी घट झाल्याने बियाण्यांसाठी झालेला खर्चसुद्धा हाती येणार नसल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात आहे. नदी-नाले, तलाव, ओढे यांनी आतापासूनच तळ गाठायला सुरुवात केली आहे. काही गावांमध्ये तर आतापासूनच टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अत्यल्प पावसाने खरीप हंगामानंतर आता रबीही धोक्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. त्यात ५५ पैसे आणेवारी काढून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच प्रकार केला असल्याच्या प्रतिक्रिया आता शेतकरी वर्गातून उमटत आहे. (प्रतिनिधी)