a living born baby thrown in river of ner yavatmaal | तुला आई कसं म्हणू... नदीच्या पात्रात फेकले जिवंत अर्भक 
तुला आई कसं म्हणू... नदीच्या पात्रात फेकले जिवंत अर्भक 

नेर(यवतमाळ) आज सकाळी सहा वाजता मीलमिली नदीच्या पात्रात एक पुरुष जातीचे पाच महिन्याच्या मृतावस्थेत अर्भक तरंगताना आढळल्याने शहरात खळबळ माजली. सदर अर्भक अज्ञात कुमारी मातेने फेकले की अनधिकृत रुग्णालयात हा गर्भपात करण्यात आला किंवा अनैतिक संबंधातून कुमारी मातेने अर्भक मिलमिली नदीत फेकले यावर पोलीस तपास करीत आहेत.

मीलमिली नदीच्या पात्रात कोणीतरी अज्ञात मातेने पाच महिन्याच्या अर्भकाला नदीच्या पात्रात फेकुन दिले. मात्र, बाळाची नाळ पिण्याच्या पाइपलाईनला अडकल्याने सदर अर्भक हे तरंगू लागल्याने सदर घटनेचे बिंग फुटले व नागरिकांसमोर आले. अधिकृत रुग्णालयातील गर्भपात  जन्मले असण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी सुद्धा मिलमीली नदीजवळ व जुन्या गुरांच्या दवाखान्याजवळ अशा प्रकारचे अर्भक सापडले होते. मात्र, पोलिस तपास संथगतीने झाल्याने अनधिकृत रूग्णालयाला पाठबळ मिळाले. दरम्यान, अजूनही नेर शहरात अनधिकृत रुग्णालयाचे अस्तित्व असून या ठिकाणी अवैध मार्गाने चाललेल्या अनेक नवजात बाळांना मृत्यूच्या खाईत लोटल्या जात आहे. मिलमीली नदीच्या पात्रातील अर्भकाला बघण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. माजी नगरसेवक सुनील खाडे यांनी पोलिसांना पाचारण केले. सदर प्रकरणाचा तपास नेर पोलिस स्टेशनचे ठाणेदार पी.एस. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश इंगळे स्वप्नील निराळे, हे. काँ. मंगलसिंग चव्हाण इस्माईल आझाद, सचिन जाधव करीत आहे.
 

Web Title: a living born baby thrown in river of ner yavatmaal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.