शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोला ‘आधार’चे लिंकेज

By admin | Updated: November 11, 2014 22:47 IST

रोजगार हमी योजनेला लागलेली भ्रष्टाचाराची वाळवी काढण्याचा खटाटोप प्रशासनाकडून केला जात आहे. सुरुवातीला कागदोपत्री होणारे कामकाज आता आॅनलाईन करण्यात आले आहे.

गैरप्रकाराला आळा : ५६ हजार मजुरांच्या बँक खात्यासह एमआयएस कनेक्टेडयवतमाळ : रोजगार हमी योजनेला लागलेली भ्रष्टाचाराची वाळवी काढण्याचा खटाटोप प्रशासनाकडून केला जात आहे. सुरुवातीला कागदोपत्री होणारे कामकाज आता आॅनलाईन करण्यात आले आहे. त्यासाठी एमआयएस (मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टीम) स्वतंत्र संगणक प्रणालीही विकसित केली. आता या एमआयएसला आधार कार्ड लिंकेज करून प्रत्यक्ष राबणाऱ्या मजुरांच्या हाताला काम दिले जाणार आहे. जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून मिळणाऱ्या कामासाठी आठ लाख ३४ हजार मजुरांनी नोंदणी केली आहे. त्यांना कामासाठी जॉब कार्डही वितरित करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र यातील एक लाख ३० हजार मजूरच सक्रिय असल्याचे आढळून आले आहे. बरेचदा बोगस जॉब कार्डचा वापर करून कंत्राटदारांकडूनच रोहयोच्या निधीचा मलिदा लाटल्याचे उघड झाले आहे. कोट्यवधी रुपयांची तरतूद असलेली ही योजना अधिकारी आणि कंत्राटदारांनी आपले कुरण बनविली होती. अनेकजण रोहयोतील पळवाटांमुळे काम न करताच आर्थिकदृष्ट्या गलेलठ्ठ झाले आहे. या योजनेतील भ्रष्टाचार पूर्णत: संपुष्टात आणण्यासाठी शासनस्तरावरूनच सातत्याने नवनवीन प्रयोग केले जात आहे. एमआयएसमुळे रोहयोचे संपूर्ण कामकाज आॅनलाईन झाले. शिवाय मजुरांचे जॉब कार्डही आॅनलाईनच भरण्यात येवू लागले. प्रत्यक्ष कामावर असलेल्या मजुरांचा फोटो आणि त्याचे बँक अथवा पोस्टात असलेल्या खात्यांचा क्रमांक याची नोंद करण्यात आली. यातही काही अंशी त्रुट्या असल्याने आता आधारकार्ड द्वारे ही बँक खाती जोडली जाणार आहे. तसेच एमआयएसशीसुद्धा आधार कार्डचे लिंकेज केले जाणार आहे. आतापर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाने पंचायत समितीस्तरावरून ५६ हजार ५३१ मजुरांचे बँक खाते आणि एमआयएस याच्याशी आधार कनेक्टेड केले आहे. या उपाययोजनांमुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला आळा बसेल, अशी आशा आहे. (कार्यालय प्रतिनिधी)