शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या स्वच्छतेसाठी चिमुकले सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:00 IST

नगरपरिषद प्रशासन केवळ कागदोपत्रीच स्वच्छता अभियान राबविते. परिणामी गावात ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे साचले आहे. प्रशासनसोबतच नागरिकही स्वच्छतेबाबत उदासीन दिसून येत आहे. त्यामुळे आता शहरातील आठवीच्या विद्यार्थ्यांनी ‘पर्यावरण मित्र’ नावाचा समूह तयार केला. या समूहातील विद्यार्थी प्रत्येक रविवारी चौकाचौकात धडकून कचऱ्याचे ढिगारे पालिकेच्या कचरा कुंडीत भरताना दिसत आहे.

ठळक मुद्देआर्णीत उपक्रम : दर रविवारी अभियान, नागरिकांकडून कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे आपल्या गावाची प्रतिष्ठा धुळीस मिळते. त्यामुळे आता प्रशासनाच्या भरवशावर न राहता आपणच आपल्या परिसराची स्वच्छता करून आपले शहर स्वच्छ ठेवण्याचा विडा शहरातील पर्यावरण मित्र असलेल्या चिमुकल्यांनी उचलला आहे.नगरपरिषद प्रशासन केवळ कागदोपत्रीच स्वच्छता अभियान राबविते. परिणामी गावात ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे साचले आहे. प्रशासनसोबतच नागरिकही स्वच्छतेबाबत उदासीन दिसून येत आहे. त्यामुळे आता शहरातील आठवीच्या विद्यार्थ्यांनी ‘पर्यावरण मित्र’ नावाचा समूह तयार केला. या समूहातील विद्यार्थी प्रत्येक रविवारी चौकाचौकात धडकून कचऱ्याचे ढिगारे पालिकेच्या कचरा कुंडीत भरताना दिसत आहे.संबंधित परिसरातील सर्व दुकानदारांना कचरा रस्त्यावर न टाकता कचरा कुंडीत टाकण्याची विनंती करीत आहे. आपला देश स्वच्छ करायचा असेल, तर सुरुवात स्वत:पासून व गावापासून करावी, लागेल असा संदेशही ते दुकनदारांना आवर्जून देतात. केवळ सोशल मीडियावर स्वच्छता मोहीम राबविणाºयांना चपराक लगावून या चिमुकल्यांनी त्यांच्यासमोर आदर्श उभा केला आहे.खुल्या हाताने कचरा वेचणाºया या चिमुकल्यांना आसिफ चव्हाण यांनी हात मोजे उपलब्ध करून दिले. गणेश हिरोळे, इरफान रजा आदींनी त्यांचे कौतुक करून सहकार्य केले. या चिमुकल्यांच्या उपक्रमात सर्व पर्यावरण प्रेमींनी सहभागी व्हावे, अशी सर्वांनाच अपेक्षा आहे.‘मूर्ती लहान, पण कीर्ती महान’चा प्रत्ययशहरातील स्वच्छतेसाठी पुढे सरसावलेली ही वानर सेना आहे. मूर्ती लहान, पण कीर्ती महान, अशी प्रचिती त्यांनी आणून दिली आहे. येथील म.द.भारती विद्यालयातील आठवीतील सक्षम ढाकुलकर, क्रीश राऊत, कृष्णा डवले, सोहम हरसूलकर, हृषीकेश गुटे, सिद्धांत चौधरी, वेदांत पद्मावार, आयुष दुल्लरवार, तिलक कुशवाह आदी चिमुकले या उपक्रमात सहभागी झाले आहेत. त्यांचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक