शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या

By admin | Updated: October 21, 2014 22:58 IST

दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या पडत आहे. गत दोन दिवसांपासून यवतमाळची बाजारपेठ हाऊसफुल्ल असून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची

यवतमाळ : दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या पडत आहे. गत दोन दिवसांपासून यवतमाळची बाजारपेठ हाऊसफुल्ल असून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची वर्दळ दिसत आहे. या गर्दीत कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय असली तरी उधार उसणवार करून शेतकरीही खरेदी करताना दिसत आहे. दिवाळी अवघ्या एक दिवसावर आली आहे. प्रत्येकजण उत्साहात दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. हात सैल सोडून प्रत्येकजण दिवाळीच्या खरेदीत व्यस्त आहे. यवतमाळच्या कपडा बाजारात तर तुफान गर्दी झाली आहे. इंदिरा गांधी मार्केट, मेनलाईनमध्ये शहरातील ग्राहकांची तर नेताजी मार्केटमध्ये ग्रामीण भागातून आलेल्या ग्राहकांची मोठी गर्दी दिसत आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण कपडे खरेदी करताना दिसत आहे. सर्वांचा कल रेडिमेड कपड्यांकडे असून त्यातही शहरी ग्राहक ब्रॅन्डेड कपड्यांना पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. कपड्यासोबतच आकाश दिवे, पणत्या, रांगोळी, घराचे सजावटी साहित्य घेताना गृहिणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. प्रत्येक दुकानात सध्या पाय ठेवायलाही जागा नाही. सकाळी ९ वाजता उघडलेले दुकान रात्री उशिरापर्यंत सुरू असते. फटाके खरेदीसाठी बच्चेकंपनी आतूर असून आपल्या पालकांना घेऊन आझाद मैदान गाठत आहे. तर अनेक पालक शहरातील फटाका दुकानातून फटाके खरेदी करताना दिसत आहे. कर्मचाऱ्यांचे झालेले पगार आणि मिळालेल्या बोनसमुळे खरेदीचा उत्साह द्विगुणित झाला आहे. या गर्दीत मात्र शेतकरी हात राखून खरेदी करताना दिसत आहे. नाईलाजाने उधार उसणवार करून मुलाबाळांसाठी कपडे खरेदी करावे लागत आहे. सोयाबीन, कपाशीने दिलेल्या दग्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आहे. मात्र बाजारपेठेतील ग्राहकांचा दिसत असलेला उत्साह आनंद द्विगुणित करणारा आहे. (नगर प्रतिनिधी)