शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंपाची वीज बिल थकबाकी १२०० कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 06:00 IST

कृषीपंपावर १६ तासांचे भारनियमन आहे. तीन दिवस दिवसा तर चार दिवस रात्री वीजपुरवठा करण्यात येतो. भारनियमनामुळे शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने ओलितही करता येत नाही. याचा परिणाम सिंचनावर झाला आहे. ‘झिरो लोडशेडींग’च्या नावावर तासन्तास वीज गायब असते. डीपीवरचे फेज वारंवार उडतात. लाईन ट्रिप होते. यानंतरही अनेक दिवस विजेचा पुरवठा सुरळीत होत नाही.

ठळक मुद्देटांगती तलवार : १० तासच वीज पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्ग प्रकोप आणि शेतमालास न मिळणारे दर यामुळे शेतकऱ्यांना कृषीपंपाचे वीज बिलही भरता आले नाही. अनेक वर्षांची ही थकबाकी आता १ हजार २०१ कोटींच्या घरात पोहचली आहे. या थकबाकीमुळे कृषीपंपावरीला विजेचा पुरवठा १० तासापर्यंतच मर्यादित राहिला आहे.कृषीपंपावर १६ तासांचे भारनियमन आहे. तीन दिवस दिवसा तर चार दिवस रात्री वीजपुरवठा करण्यात येतो. भारनियमनामुळे शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने ओलितही करता येत नाही. याचा परिणाम सिंचनावर झाला आहे.‘झिरो लोडशेडींग’च्या नावावर तासन्तास वीज गायब असते. डीपीवरचे फेज वारंवार उडतात. लाईन ट्रिप होते. यानंतरही अनेक दिवस विजेचा पुरवठा सुरळीत होत नाही. यामुळे कृषीपंपाची वीज शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरली आहे.जंगली श्वापद, शेतमालास न मिळणारे दर यामुळे शेतकºयांना शेतीचा खर्चही काढता आला नाही. अशा स्थितीत वीज बिल भरायचे कसे, हा प्रश्न आहे. आता थकबाकी, त्यावर पडलेले व्याज, दंड यातून थकबाकी १ हजार २०१ कोटी ८७ लाखांच्या घरात पोहचली आहे. पुढील काळात ही थकबाकी आणखी वाढणार आहे.एक लाख १५ हजार ग्राहक अडचणीतवीज कंपनीने थकबाकी कमी करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली. मात्र शेतकºयांच्या खिशातच पैसा नसल्याने त्यांना थकबाकी भरता आली नाही. यातून थकबाकीचा आकडा वाढला आहे. एक लाख १५ हजार कृषीपंपधारक अडचणीत सापडले आहेत. यामुळे वीज कंपनीही अडचणीत आली आहे.सोलर युनिट उत्तम पर्यायकृषीपंपाला वीजपुरवठा करणारी वीज वाहिनी सौरउर्जेने बनविली. त्यावरून विजेचा पुरवठा केला तर शेतकºयांना दिवसाच वीज मिळेल. कृषीपंपाच्या वीजबिल थकबाकीचा प्रश्नच उरणार नाही, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज