शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत कळंबला दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व

By admin | Updated: April 10, 2017 01:55 IST

जिल्हा परिषदेत मागील ५५ वर्षांच्या इतिहासात कळंब तालुक्याला नंदिनी दरणे यांच्या रुपाने दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व

गजानन अक्कलवार  कळंबजिल्हा परिषदेत मागील ५५ वर्षांच्या इतिहासात कळंब तालुक्याला नंदिनी दरणे यांच्या रुपाने दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. प्रवीण देशमुख यांनी मागील पंचवार्षिकमध्ये थेट अध्यक्ष म्हणून तालुक्याचे नेतृत्व केले. जिल्हा परिषद निवडणुकीत कळंब तालुका विकास आघाडीने दोन जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यातील एक जागा जिंकली. एका जागेच्या भरवशावर पद मिळेल, याची कोणाला अपेक्षाही नव्हती. परंतु राजकीय समीकरण जुळविताना अनपेक्षितपणे प्रवीण देशमुख गटाला लॉटरी लागली. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर नंदिनी दरणे यांची सभापतिपदी वर्णी लागणार याविषयी अटकले बांधली जात होती. ती शेवटी खरी ठरली. येणाऱ्या काळात कळंब तालुका विकास आघाडीच्या बांधणीत सभापतिपदाचा किती फायदा करून घेतला जातो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सावरगाव-कोठा गटातून नंदिनी दरणे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक पहिल्यांदाच लढविली. विजयी होत त्या सभापतिपदी विराजमान झाल्या. यापूर्वी त्यांनी हिवरादरणे गावचे सरपंचपद भुषविले आहे. महिला पंचायतराज सक्षमीकरण अंतर्गत जिल्ह्यातील सरपंचाचे त्यांनी प्रतिनिधित्वही केलेले आहे. त्यांचे पती बालु पाटील दरणे हे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष आहे. सहकार क्षेत्रात मोठे प्रस्थ मानले जातात. प्रवीण देशमुख यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.