शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यागतांच्या भेटीसाठी जिल्हा परिषद सीईओंकडे दोनच दिवस

By admin | Updated: June 3, 2016 02:39 IST

जिल्हाधिकाऱ्यांची भेट न झाल्याने एका तरुणाने विष प्राशनाचा प्रकार जिल्ह्यात ताजा असताना आता यवतमाळ

कक्षाबाहेर फलक : राणीअमरावतीच्या शिष्टमंडळाला भेट नाकारली यवतमाळ : जिल्हाधिकाऱ्यांची भेट न झाल्याने एका तरुणाने विष प्राशनाचा प्रकार जिल्ह्यात ताजा असताना आता यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने अभ्यागतांना भेटण्यासाठी आठवड्याचे दोनच दिवस राखीव ठेवले आहे. यासाठी त्यांनी आपल्या कक्षाबाहेर तसा फलकही लावला आहे. गुरुवारी जिल्हा परिषदेत आलेल्या राणीअमरावतीच्या शिष्टमंडळाला यामुळे परत जावे लागले. जिल्हा परिषद मिनी मंत्रालय म्हणून ओळखली जाते. ग्रामीण भागातील नागरिकांचे जिल्हा परिषदेशी थेट संपर्क असतो. अधिकाऱ्यांनी अडवणूक केल्यास अनेक जण थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटून आपल्या अन्यायावरील दाद मागतात. परंतु आता यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंघला यांनी अभ्यागतांना भेटण्यासाठी सोमवार आणि शुक्रवार हे दोन दिवस राखीव ठेवले असून येणाऱ्या अभ्यागतांना ते दुपारी ३ ते ६ याच वेळेत भेट देणार आहे. यामुळे ऐनवेळी शिष्टमंडळ अथवा कामानिमित्त आलेल्या सर्वसामान्यांना मात्र सीईओंची भेट होणार नाही. अभ्यागतांना सोमवार किंवा शुक्रवारचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)