शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची बंगलोरच्या कंपनीत निवड

By admin | Updated: July 3, 2017 02:06 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल विभागातील सत्र २०१६-१७ या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची अरविंद लि.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल विभागातील सत्र २०१६-१७ या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची अरविंद लि. बेंगलोर या टेक्सटाईल उद्योग क्षेत्रातील कंपनीत निवड झाली आहे. यामध्ये तृप्ती पाठक, रवी कटारे, उमेश पाटील, मेहरा फाळके, अंजली सिंगनजुळे यांचा समावेश आहे. अरविंद लि. ही भारतातील टेक्सटाईल उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय अहमदाबाद गुजरातमध्ये आहे. ही कंपनी शर्टिंग, डेनिम, निट्स आणि बॉटमवेट फॅबरिक्स बनविते. या कंपनीचे फ्लार्इंग मशीन, न्यू पोर्ट, रफ अँड टफ, अरविंद आरटीडब्ल्यू इत्यादीसारखे स्वत:चे ब्रॅण्ड आहेत. अ‍ॅरो, ली, रॅगलर आदींसारखे लायसन्स इंटरनॅशनल ब्रॅण्ड आहे. अशा महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या कंपनीत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. कंपनीचे ह्यूमन रिसोर्स मॅनेजर विकास त्रिपाठी यांनी विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घेतला. सर्वप्रथम टेक्नीकल टेस्ट घेण्यात आली. नंतर मुलाखतीद्वारे पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांना प्रथम तीन महिने मॅनेजमेंट इंजिनिअर ट्रेनी या पदावर नियुक्ती देण्यात आली. नंतर त्यांना २.६४ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले जाईल. टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची आतापर्यंत नेदरलँड स्थित कंट्रोल युनियन, व्हीएचएम इंडस्ट्रीज लि. अमरावती, आर.एस.जे. इन्स्पेक्शन सर्विसेस प्रा.लि. मुंबई, डोनिअर सुटिंग लि. सुरत, श्याम इंडोफॅब प्रा.लि. अमरावती, यासारख्या नामांकित टेक्सटाईल कंपनीत निवड झाली आहे. टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांना आतापर्यंत १.६ ते २.६४ लाखांच्या वार्षिक पॅकेजवर महाविद्यालयातर्फे कॅम्पस प्लेसमेंट झालेले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे टेक्सटाईल अभियांत्रिकी विभागातर्फे कौतुक करण्यात येत आहे.