शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगारांना विमा कवच

By admin | Updated: September 10, 2014 00:00 IST

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ समितीने केलेल्या शिफारशीनुसार बांधकाम कामगारांना विमा सुरक्षा मिळणार आहे. त्यांना आरोग्य व वैयक्तिक अपघात विमा योजना लागू

यवतमाळ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ समितीने केलेल्या शिफारशीनुसार बांधकाम कामगारांना विमा सुरक्षा मिळणार आहे. त्यांना आरोग्य व वैयक्तिक अपघात विमा योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. या संदर्भातील कंत्राट दिलेल्या विमा कंपनीने पूर्वीचा ३७ कोटी रुपयांचा प्रस्ताव सुधारित करून दिला असून सुधारित प्रस्तावाची रक्कम आता २० कोटी रुपये केली आहे. सुधारित प्रस्तावास पुढील एक वर्ष कालावधीसाठी शासनाने काही अटींसह मान्यता प्रदान केली आहे. आरोग्य व वैयक्तिक विमा योजना लागू करण्यासाठी मंडळाने विहित व पारदर्शक कार्यप्रणालीच अवलंब करणे आवश्यक आहे. होणाऱ्या खर्चात कोणत्याही प्रकारची अनियमितता होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे काही झाल्यास याची जबाबदारी कामगार आयुक्तांची राहील, असेही उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने म्हटले आहे. यापूर्वीसुद्धा बांधकाम कामगारांसाठी आरोग्य व अपघात विमा योजना प्रायोगिक तत्वावर २३ जुलै २०१३ पासून लागू करण्यात आली होती. त्यासाठी विमा कंपन्यांची ‘ब्रोकर’ म्हणून नियुक्ती केली होती. त्यावेळी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे विमा हप्त्यापोटी ३७ कोटी ३ लाख १७ हजार १०५ रुपये सबंधित विमा कंपनीला देण्यात आले होते. परंतु आजमितीस केवळ ९७८ बांधकाम कामगारांना केवळ ३ कोटी ८२ लाख ६६ हजार ४८ रुपये रकमेचाच लाभ या विमा योजने अंतर्गत मिळाला. परंतु मंडळाने भरलेला ३७ कोटी रुपयांचा विमा हप्ता त्या तुलनेत फार जास्त आणि मिळालेला लाभ हा अत्यल्प होता. त्यामुळे ही योजना त्यावेळी फारशी फलदायी ठरली नाही. २५ जुलै १४ रोजी या योजनेचा कालावधी संपुष्टात आला. त्यानंतर बांधकाम कामगारांच्या भविष्याचा विचार करून मंडळाने राज्य व राष्ट्रीयस्तरावरील विविध पर्यायांची चाचपणी केली. सर्व पर्यायांच्या विचाराअंती बांधकाम कामगारांना आरोग्य व वैयक्तिक विमा योजना तीन वर्षांसाठी लागू करण्याचा निर्णय घेतला. तसा प्रस्ताव शासनाला पाठविला. परंतु शासनाने सध्या एक वर्षासाठी ही योजना लागू केली आहे. यामुळे कामगारांमध्ये समाधान व्यक्त होत असले तरी लाखो कामगार अद्यापही विम्यापासून वंचित आहेत. (प्रतिनिधी)