शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
6
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
7
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
8
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
9
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
10
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
11
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
12
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
13
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
14
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
15
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
16
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
17
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
18
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
19
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
20
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

धडक सिंचन विहिरींना तातडीने वीज जोडणी

By admin | Updated: October 7, 2015 03:03 IST

वीज जोडणी नसल्याने अनेक कृषीपंपधारक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे ओरडही वाढली आहे.

बैठक : वीज वितरण कंपनीला निर्देशयवतमाळ : वीज जोडणी नसल्याने अनेक कृषीपंपधारक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे ओरडही वाढली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विहिरींना तातडीने वीज जोडणी देता यावी म्हणून शासनाने जिल्ह्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी विशेष निधीही मिळणार आहे. वीज कंपनीने शेतकऱ्यांच्या प्रलंबित सर्व विहिरींना तातडीने जोडणीचे नियोजन करून त्याप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.महसूल भवन येथे कृषीपंप जोडणीचा त्यांनी आढावा घेतला. बैठकीला वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विजय भटकर, रोहयो उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुळकर्णी, जिल्हा परिषद सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता वद्देवार आदी उपस्थित होते. वीज जोडणीच्या कामाला गती देण्यासाठी जोडणीचा वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी नियमित आढावा घेण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. जिल्ह्यात १५ ठिकाणी ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राचे काम सुरु आहे. या कामासह जी विविध कामे कंत्राटदारांकडून जिल्ह्यात सुरु आहे, अशा कंत्राटदारांना कामास गती देण्याच्या अनुषंगाने वारंवार निर्देश दिले जावे. शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या बाबींचा पाठपुरावा करण्याचा सूचनाही त्यांनी केल्या. धडक सिंचन योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या विहिरींनाही प्राधान्याने वीज जोडणी द्यावयाचे आहे. त्यासाठी पूर्ण विहिरींची यादी प्राप्त करून घेण्यात यावी व त्या शेतकऱ्यांकडून मागणी अर्ज घेऊन तातडीने या विहिरींचा वीज जोडण्या पूर्ण कराव्या, असे यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. या आढावा बैठकीमध्ये दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मिक उर्जा विकास योजना तसेच पायाभूत सुविधा आराखडा योजनेंतर्गत सुरु असलेल्या वीज विकासाच्या कामांचा आढावाही जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. (स्थानिक प्रतिनिधी)