शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

भूखंडांची बेकायदा विक्री

By admin | Updated: May 19, 2014 23:55 IST

दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात नगररचना कायदा आणि बांधकाम नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करून भूखंंड खरेदी-विक्री व्यवहार सुरू आहेत.

पुसद : दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात नगररचना कायदा आणि बांधकाम नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करून भूखंंड खरेदी-विक्री व्यवहार सुरू आहेत. भूमाफियांच्या बेकायदेशीर खरेदी विक्रीला मार्गदर्शन आणि सहकार्य याच कार्यालयातून होत असून यामुळे भविष्यात अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. महसूल विभागही याकडे डोळेझाक करीत आहे. पुसद तालुक्यात नागरीकरण वाढत असून नगरपालिका आणि ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहती निर्माण होत आहेत. या स्थितीचा फायदा घेण्यासाठी भूमाफिया सरसावले असून पैशाच्या जोरावर कायद्याची पायमल्ली करून जमिनीचे भूखंड आणि उपखंंड करून विकले जात आहेत. कृषी वापरातील जमिनी अकृषीसाठी उपयोगात आणली जात आहे. यासाठी आवश्यक असणारी अकृषक परवान्याची विहीत पद्धती अनुसरण्यात येत नाही. शहरी क्षेत्रात सहायक संचालक नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रात राज्य शासनाचे सहायक संचालक नगररचना यांचा अंतिम अभिन्यास (ले-आऊट) मंजूर असल्याशिवाय भूखंड खरेदी-विक्री व्यवहाराची नोंदणी करू नये. अशी अट आहे. मात्र पुसदच्या दस्त नोंदणी कार्यालयात या नियमाला फाटा देऊन नोंदण्या होत आहेत. महाराष्टÑ जमीन महसुलाचे कलम ४४ नुसार ज्या प्रयोजनाच्या वापराला अकृषक परवानगी दिली आहे. अशांचा वापर एका वर्षाच्या आत न केल्याचे उघडकीस आल्यास त्याची दस्त नोंदणी दुय्यम निबंधकांनी करू नये, अशी कायद्यात तरतूद आहे. परंतु पुसद कार्यालयात भूखंड माफिया आपले वजन वापरुन सर्रास खरेदी विक्रीच्या नोंदी करीत आहेत. या बेकायदेशीर व्यवहारामुळे खुली जागा (ओपन स्पेस) न ठेवणे. अभिन्यास बदलणे. अंतर्गत रस्ते, मर्यादापेक्षा कमी रुंदीचे ठेवणे असे प्रकार दिसत आहेत. भूखंड खरेदी करणार्‍यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात घेऊनही काहीच करता येत नाही. कारण भूखंड विक्री करणारे दडपशाहीचा वापर करतात. महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी यावर निर्बंध घालावेत, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)