शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोदणीत खनिजांचे अवैध उत्खनन

By admin | Updated: September 13, 2014 00:33 IST

शहरापासून अगदी काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गोदणी गावाला स्टोन क्रशरचा विळखा आहे.

यवतमाळ : शहरापासून अगदी काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गोदणी गावाला स्टोन क्रशरचा विळखा आहे. येथे गेल्या काही वर्षांपासून अवैधरित्या हजारो ब्रासचे उत्खनन झाल्याचा प्रकार बाहेर आला आहे. उत्खननासाठी शासनाची अधिकृत परवानगी आवश्यक आहे. या परवान्याचे वेळोवेळी रक्कम भरून नूतनीकरण करावे लागते. मात्र येथील काही स्टोन क्रशर चालकांनी दोन ते तीन वर्षांपासून परवान्याचे नूतनीकरणच केले नाही. ही बाब तलाठ्याने केलेल्या तपासणीत उघड झाली आहे. शासनाच्या गौण खनिजावर अनेक स्टोन क्रशर चालक पोसले जात आहे. यंत्रणेतील काही फितुरांमुळे या स्टोन क्रशर चालकांचे चांगलेच फावत आहे. गोदणी शिवारात एका शेतकऱ्याने अनधिकृतरित्या आपल्या शेतात गिट्टी खदान लावली आहे. उत्खननाची साक्ष देणारे मोठमोठाले खड्डे या शेतकऱ्याच्या शेतात आजही कायम आहे. गोदणी परिसरातील स्टोन क्रशर चालकांनी परवाना नूतनीकरण केले की नाही याची तपाासणी करण्याचे निर्देश तहसीलदार अनुप खांडे यांनी त्या त्या साजातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना दिले होते. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता धक्कादायक माहिती समोर आाली. एक हेक्टर ६२ आर मध्ये उत्खनन करणाऱ्या परवान्याची मुदत फेब्रुवारी महिन्यातच संपली. तर अन्य दोघांनी स्टोन क्रशर परवान्याचे नूतनीकरण केले नाही. नेमका या स्टोन क्रशर चालकांनी किती रुपयांचा महसूल बुडविला आहे याचा शोध महसूल यंत्रणेकडून घेण्यात येणार आहे. या तांत्रिक बाबी तपासण्यासाठी बांधकाम विभागाचे अभियंत्यांना तहसीलदार अनुप खांडे यांनी निर्देश दिले आहे. त्यानंतरच या तीनही स्टोन क्रेशर चालकांवर दोषारोप निश्चित करून कार्यवाही केली जाणार आहे. गोदणी परिसरात अवैध उत्खनन होत असल्याच्या तक्रारी नेहमीच केल्या जातात. मात्र प्रत्यक्ष कारवाई होताना दिसत नाही. परवाना नूतनीकरण न केल्याची बाब प्रशासनाने गांभीर्याने घेतली असून त्याची सखोल चौकशीही केली जात आहे. या तीनही स्टोन क्रशर चालकाचा विद्युत पुरवठा तातडीने तोडण्यात यावा, असे पत्र महसूल यंत्रणेकडून वीज वितरण कंपनीला देण्यात आले आहे. या अवैध उत्खननात आणखी बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शासनाच्याही जमिनीत मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याचे बोलले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)