शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूमध्ये 'खेला'! अभिनेता विजयच्या पक्षाची मुसंडी; द्रमुकला धक्का
2
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
3
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
4
बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
5
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
6
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
7
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
8
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
9
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
10
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
11
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
12
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
13
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
14
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
15
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
16
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
17
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
18
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
19
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
20
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

टीव्ही पाहायचाय तर सेट टॉप बॉक्स हवाच

By admin | Updated: October 6, 2015 03:17 IST

केबल डिजिटायजेशन प्रक्रियेला शहरात प्रारंभ झाला आहे. ३१ डिसेंबरपासून सेट टॉप बॉक्स ज्यांच्याकडे आहे,

यवतमाळ : केबल डिजिटायजेशन प्रक्रियेला शहरात प्रारंभ झाला आहे. ३१ डिसेंबरपासून सेट टॉप बॉक्स ज्यांच्याकडे आहे, त्यांनाच आपल्या टीव्हीवर वाहिन्या दिसणार असल्याने आता सेट टॉप बॉक्स बसवून घेण्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा केबलचे कोणतेही प्रक्षेपण दिसणार नाही. यासाठी ग्राहकांना १२०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. महानगर पालिका क्षेत्रात घरोघरी सेट टॉप बॉक्स अनिवार्य करून त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर आता शासनाने नगरपरिषदांकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर नगर परिषद क्षेत्रात जरी अद्याप सेट टॉप बॉक्स प्रक्रियेला गती आली नसली, तरी यवतमाळ शहरात ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती स्थानिक केबल आॅपरेटर्स संचालकांनी दिली. यवतमाळ नगरपरिषदेसह उमरसरा, वडगाव, लोहारा, वाघापूर, पिंपळगाव आदी ग्रामपंचायत परिसरातही सेट टॉप बॉक्स लावणे गरजेचे आहे. परंतु, शहराला लागून असलेल्या भोसा आणि मोहा या ग्रामपंचायत परिसराचा सध्या या प्रक्रियेत समावेश नाही. याबाबत स्थानिक प्रशासनाकडून कोणत्याही स्पष्ट सूचना सर्वसामान्य केबल टीव्ही धारकांना नसल्यामुळे ग्राहकांमध्ये चांगलाच संभ्रम आहे. त्यामुळे यवतमाळ महसूल विभागाने याबाबत भूमिका जाहीर करण्याची मागणी होत आहे. केबल आॅपरेटर्सकडून मात्र सेट टॉप बॉक्स बसविण्याबाबत जनजागृती करण्यात येत असून ज्यांना तो बसवायचा आहे, त्यांना तो बसवूनही दिला जात असल्याचे दिसते. सध्या केबल सेवेमध्ये प्रचंड गोंधळ दिसून येतो. त्यामुळे नागरिकांचीही ओरड आहे. वेळीच तक्रारीची दखल घेतली जात नाही. अनेक भागात नियमित महिन्याकाठी केबलचे पैसे वसूल केले जातात. परंतु कोणतीही पावती दिली जात नसल्याच्याही ग्राहकांच्या तक्रारी आहेत. या सर्व बाबींवर आळा बसणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी ३१ डिसेंबरपर्यंत सेट टॉप बॉक्स बसवून घेण्यास हरकत नाही. (प्रतिनिधी)दरही वाढणार अन् चॅनलही४एकदाच १२०० रुपये खर्च करून सेट टॉप बॉक्स बसवून घेतल्यानंतर मात्र मासिक भाडे पूर्वीप्रमाणेच परंतु वाढीव द्यावे लागणार आहे. दोनशे ते अडीचशे रुपये महिन्याचे ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. याचे फायदेही ग्राहकांना मिळणार आहे. पिक्चर कॉलिटी ही अतिशय दर्जेदार राहणार आहे. शिवाय २०० हून अधिक वाहिन्या दिसणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना यामध्ये चॉईस राहणार आहे सोबतच ग्राहकांना नियमित सेवा मिळणेही शक्य होणार आहे.३१ डिसेंबर ही तारीख सेट टॉप बॉक्ससाठी दिली आहे. त्यामध्ये जर काही मुदतवाढ वगेरे मिळाली तर एप्रिलपासून याची निश्चितच अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी सेट टॉप बॉक्स बसवून घेण्यास हरकत नाही. याद्वारे ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळणार आहे. शिवाय शासनाच्या उत्पन्नातही भर पडणार आहे. - अनुप खांडे, तहसीलदार, यवतमाळ