शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थ्यांवर उपासमारीची पाळी

By admin | Updated: August 16, 2014 23:44 IST

जिल्ह्यातील अन्नपूर्णा योजनेचे चार हजार ६९२ लाभार्थी गेल्या चार महिन्यांपासून वंचित आहे. काही तहसील कार्यालयातील लाभार्थ्यांना फेब्रुवारी तर काहींना एप्रिल महिन्यापासून

अन्नपूर्णा योजना : गेल्या सहा महिन्यांपासून योजनेत धान्याचा तुटवडामहागाव : जिल्ह्यातील अन्नपूर्णा योजनेचे चार हजार ६९२ लाभार्थी गेल्या चार महिन्यांपासून वंचित आहे. काही तहसील कार्यालयातील लाभार्थ्यांना फेब्रुवारी तर काहींना एप्रिल महिन्यापासून धान्यच मिळाले नाही. काही तालुक्यांचा अपवाद वगळता सर्वत्र धान्याचा काळा बाजार होत असून शासनाने नेमून दिलेल्या अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थ्यांचे मात्र धान्याच्या प्रतीक्षेत अवसान गळून गेले आहे. अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थी वृद्ध असून निराधार म्हणून गणले जातात. अशा निराधारांना चार ते सहा महिन्यांपासून धान्यच मिळाले नसल्याने त्यांची स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. एकट्या महागाव तहसील कार्यालयात २६१ लाभार्थी फेब्रुवारी २०१४ पासून या योजनेंतर्गत धान्याच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत स्थानिक प्रशासनाकडे विचारणा केली असता जिल्हास्तरावरून अन्नपूर्णा योजनेंतर्गत कोणत्याच प्रकारचे धान्य मिळाले नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगण्यात आले. जिल्हा पुरवठा विभागात यासंदर्भात विचारणा केली असता जिल्ह्याला चार हजार ६९२ एवढ्या लाभार्थ्यांचे या योजनेंतर्गत उद्दिष्ट देण्यात आले असून यातील काही लाभार्थी मरण पावले आहेत तर काही लाभार्थी अंत्योदय योजनेत वर्ग करण्यात आले आहेत. डाटा एन्ट्रीचे काम सुरू असल्याने नेमका यातील मयत आणि अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी किती हे आताच सांगता येणार नाही. सदर काम पूर्ण झाल्यानंतर यासंदर्भातील आकडेवारी सांगण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नये म्हणून दर महिन्याच्या पाच तारखेला किंवा मागे-पुढे होणाऱ्या जिल्हा पुरवठा विभागाच्या बैठकीत इतर योजनेतील धान्य अन्नपूर्णा योजनेत वर्ग करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे, अशी माहिती पुरवठा विभागात कार्यरत चांदोरे यांनी दिली. त्यामुळे अशा योजनेतील लाभार्थ्याला धान्यापासून वंचित ठेवता येणार नाही. सध्या अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्याला पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ मोफत दिले जाते. कमीअधिक प्रमाणात जिल्ह्यातील तहसील कार्यालयातील लाभार्थी संख्या पाहता प्रत्येक महिन्याला १०० क्विंटल गहू आणि तेवढाच तांदूळ गेल्या सहा महिन्यांपासून वाटप होणे बाकी आहे. याबाबत वारंवार नागरिकांकडून संबंधित विभागाकडे विचारणा होत आहे. परंतु त्यांना मात्र समाधानकारक असे उत्तर मिळत नाही.प्रत्येक महिन्याला अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थ्याला लागणाऱ्या धान्याची मागणी प्रत्येक तहसील कार्यालयाने जिल्हा पुरवठा विभागाला पाठविणे अपेक्षित असते. त्यांच्याकडून ही मागणी केली जात असून प्रत्यक्ष धान्यच उपलब्ध नाही, अशी ओरड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाची आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावरील प्रशासनाच्या पाठशिवणीच्या खेळात अन्नपूर्णा योजनेतील निराधार वृद्ध मात्र शेवटच्या घटका मोजत असून त्यांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष लक्ष घालून निराधार वृद्धांना वेळेवर धान्य मिळावे, यासाठी जिल्हा पुरवठा विभागाला सूचना कराव्यात, अशी मागणी जिल्हाभरातील अन्नपूर्णाच्या लाभार्थ्यांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)