शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचा टक्का वाढला

By admin | Updated: May 28, 2015 01:51 IST

जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच बारावीच्या निकालाची टक्केवारी ९२.७७ इतकी राहिली आहे.

९२.७७ टक्के : उमरखेड, पांढरकवडा, झरी, दिग्रस, महागाव टॉप फाईव्हमध्ये यवतमाळ : जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच बारावीच्या निकालाची टक्केवारी ९२.७७ इतकी राहिली आहे. जिल्ह्यातून सर्वाधिक ९५.८४ टक्के गुण घेत अँग्लो हिंदी हायस्कूलच्या विज्ञान शाखेतील सागर संजय नखाते या विद्यार्थ्याने बाजी मारली आहे. तर मुलींमधून जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलच्या वाणिज्य शाखेतील हेमांगी अशोक कोठारी ही ९३.६९ टक्के गुण घेत अव्वल राहिली. मागील वर्षीच्या ९०.८८ टक्के निकालाचा रेकॉर्ड यावर्षी ब्रेक झाला. जिल्ह्यातील २४ हजार ४५० विद्यार्थ्यांपैकी २२ हजार ६७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाने जिल्हाच निकालाच्या गुणवत्ता यादीत आला आहे. मागास तालुक्यातही भरघोस निकाल लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या तालुक्यांच्या निकालात वाढ झाली असून जिल्ह्याचा टक्का वाढला आहे.बारावीच्या परीक्षेमध्ये जिल्ह्याच्या निकालाचा टक्का वाढला आहे. मागील वर्षी ९०.८८ टक्के निकाल लागला होता. यावर्षी यात तब्बल तीन टक्क्यांनी वाढ झाली असून ९२.७७ टक्के निकाल लागला आहे. शिवाय उमरखेड, पांढरकवडा, झरीजामणी, दिग्रस, महागाव या तालुक्यांनी टक्केवारीत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविले आहे. यावर्षीसुद्धा उत्तीर्ण होण्यात मुलीच वरचढ असून त्यांचे प्रमाण ९४.८४ टक्के इतके आहे. तर मुलांची टक्केवारी ९०.९० टक्के इतकी आहे. जिल्ह्यातील तालुक्यांच्या शाळांमध्ये निकालाची टक्केवारी भरघोस राहिली आहे. १०० टक्के निकालाच्या येथे ४४ शाळा तर १८१ शाळांचा निकाल ९० टक्क्यांच्यावर आहे. जिल्ह्यातून २४ हजार ४५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २२ हजार ६७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेच्या निकालाची टक्केवारी सर्वाधिक असून ८ हजार ३५६ विद्यार्थ्यांपैकी ८ हजार ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. वाणिज्य शाखेतील दोन हजार १६० विद्यार्थ्यांपैकी २ हजार ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. कला शाखेतील १२ हजार ८६० विद्यार्थ्यांपैकी ११ हजार ६४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. होकेशनल अभ्यासक्रमाच्या एक हजार ७४ विद्यार्थ्यांपैकी ९०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या निकालाचा जल्लोष सर्वत्र पाहायला मिळत होता. शाळा, महाविद्यालयात मात्र शुकशुकाट होता. मोबाईल अ‍ॅप्समुळे सायबर कॅफेमधीलही गर्दी यावर्षी कमी झालेली दिसून आली. बोर्डाची वेबसाईट नेहमीप्रमाणे हँग झाली होती. (कार्यालय प्रतिनिधी)दिग्रसचा यश, यवतमाळची श्रेया ठरले विदर्भाचे टॉपरदिग्रस येथील यश चांडक हा विद्यार्थी ९८ टक्के गुण मिळवून विदर्भातून पहिला तर महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. यश याने नागपुरातून बारावीची परीक्षा दिली. मूळ यवतमाळची मात्र सध्या नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रेया साबू ही ९७.२३ गुणांसह विदर्भातून मुलींमध्ये टॉपर राहिली आहे. ती येथील डॉ.रवी आणि डॉ.जयश्री साबू यांची मुलगी आहे.