घोन्सा येथील दवाखाना ढासळला

By Admin | Updated: November 15, 2014 22:55 IST2014-11-15T22:55:11+5:302014-11-15T22:55:11+5:30

तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या घोन्सा येथील आयुर्वेदिक दवाखान्याची वास्तू कधीचीच जमीनदोस्त झाली आहे़ त्यामुळे तेथे कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रूग्णांवर

The hospital in Ghonsa was shattered | घोन्सा येथील दवाखाना ढासळला

घोन्सा येथील दवाखाना ढासळला

आरोग्य विभागाचे दुर्लक्ष : जीव मुठीत घेऊन रूग्णांवर उपचार
वणी : तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या घोन्सा येथील आयुर्वेदिक दवाखान्याची वास्तू कधीचीच जमीनदोस्त झाली आहे़ त्यामुळे तेथे कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रूग्णांवर उपचार करावे लागत आहे. तरीही आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
गेल्या कित्येक वर्षांपूर्वी घोन्सा येथे आयुर्वेद दवाखान्यासाठी वास्तूची निर्मिती करण्यात आली होती. गेल्या १0 वर्षांपूर्वी या वास्तूच्या मागील बाजूची अर्धी भिंत कोसळली होती. परिणामी समोरील एकच खोली रूग्णांच्या उपचारासाठी शिल्लक राहिली आहे़ आता शिल्लक उरलेल्या वास्तूलाही अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहे. जागोजागी तडे गेले आहेत. ही वास्तू कधी आणि कुणावर कोसळेल, याचा कोणताच काही नेम उरला नाही. त्यामुळे तेथे कार्यरत डॉक्टरांना जीव मुठीत घेऊन रुग्णांवर उपचार करावे लागत आहे़
घोन्सा येथील या दवाखान्याच्या वास्तूची प्रचंड दुर्दशा होत असताना तालुका आरोग्य विभाग मूग गिळून आहे. अद्याप या वास्तूच्या दुरुस्तीसाठी कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. साधी डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे तेथे कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांसह दवाखान्यात येणाऱ्या रूग्णांचाही जीच संकटात सापडला आहे. वास्तू त्यांच्यावर कोसळल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता बळावली आहे. तरीही तेथे उपचार सुरूच आहे. पडक्या वास्तूतही रूग्ण उपचार घेण्यासाठी जातच आहेत. याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. मात्र आरोग्य विभाग अद्याप कुंभकर्णी झोपतेच आहे.
या दवाखान्यात परिचराचे पदही गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. परिणामी दवाखान्याचा पूर्ण भार तेथे कार्यरत एकमेव डॉक्टरांवर येऊन पडला आहे. एकाच डॉक्टरला सर्व काम सांभाळावे लागत आहे़ त्यामुळे त्यांनाही नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या जीर्ण वास्तूबाबत दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे माहिती दिली. मात्र त्यांच्या माहितीची आरोग्य विभागाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही़ दवाखान्यात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहे परंतु वास्तू मात्र पूर्णत: खचलेली आहे़ या वास्तूवरील कवेलू फुटल्यामुळे पावसाळ्यात दवाखान्यात पाण्याचे तळे साचते़ त्यामुळे चक्क दवाखान्याचेच आरोग्य धोक्यात सापडते़ या दवाखान्याच्या जीर्ण वास्तूत पाणी गळत असल्याने रूग्णांवर कसा उपचार करावा, असा प्रश्न तेथील डाक्टरांना पडतो. जुन्या वास्तूचे बांधकामही निकृष्ट झाल्याने हा प्रकार उद्भवला आहे. कार्यरत डॉक्टरांनी काम करावे लागते म्हणून तूर्तास या वास्तूची थोडी फार तात्पुरती डाागडुजी करवून घेतली आहे. तरीही वरिष्ठ लक्ष द्यायला तयार नसल्याने आता त्यांचीच गोची झाली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: The hospital in Ghonsa was shattered