शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड तालुक्यात आरोग्य यंत्रणा कोलमडली

By admin | Updated: August 19, 2015 02:45 IST

तालुक्याच्या अडीच लाख लोकसंख्येकरिता असलेली आरोग्य यंत्रणा पावसाळ्याच्या दिवसात कोलमडली असून उमरखेड ...

उमरखेड : तालुक्याच्या अडीच लाख लोकसंख्येकरिता असलेली आरोग्य यंत्रणा पावसाळ्याच्या दिवसात कोलमडली असून उमरखेड येथील शासकीय रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांवर योग्य उपचारच होत नाही. यामुळे रुग्णांना खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत असून यासंधीचा फायदा बोगस डॉक्टर घेत आहे.उमरखेड तालुक्यात उमरखेड येथे राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय कुटीर रुग्णालय, सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३६ आरोग्य उपकेंद्र आहे. तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची धुरा सांभाळण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. परंतु तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते. उमरखेड येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर खासगी प्रॅक्टीसमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना रेफर करण्याची घाई येथील कर्मचाऱ्यांना झालेली असते. शासकीय रुग्णालयात घाणीचे साम्राज्य असून स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. येथील रुग्णालयात एक्स-रे मशीन नाही. रक्ताच्या तपासण्या होत नाही. शिवाय रुग्णांना औषधी बाहेरुन आणण्याचा सल्ला दिला जाते. सध्या शहरासह ग्रामीण भागात तापाची साथ पसरली आहे. हातपाय दुखणे, ताप येणे, डायरिया अशी लक्षणे दिसत आहे. शेकडो रुग्ण शासकीय आणि खासगी रुग्णालयात दिसत आहे. ढगाळ वातावरणामुळे दमाच्या आजारात वाढ झाली आहे. मात्र शासकीय रुग्णालयात उपचार होत नसल्याने खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागतो. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही ती मंडळी बोगस डॉक्टरांच्या तावडीत सापडतात. तालुक्यातील दराटी, सोनदाबी, जेवली, बिटरगाव, भवानी, मेट, चिखली, बाळदी, चुरमुरा, अकोली, पिरंजी, कृष्णापूर यासह अनेक गावात बोगस डॉक्टरांची दुकानदारी सुरू आहे.तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला रिक्त पदाचे ग्रहण लागले असून रुग्णांना वैद्यकीय सुविधा वेळेवर मिळत नसल्याची ओरड होते. १२० किलोमीटर विस्तारीत या तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३६ आरोग्य उपकेंद्र आहे. परंतु अनेक ठिकाणी रिक्त पदांचे ग्रहण आहे. बंदी भागातील उपकेंद्रात आरोग्य सेविका आणि सेवकांची पदे रिक्त आहे. मुळावा येथील वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद प्रभारावर सुरू आहे. दुर्गम भागातील वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाही नाही. (शहर प्रतिनिधी)