शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस येथे हज प्रशिक्षण शिबिर

By admin | Updated: August 19, 2015 02:46 IST

जिल्हास्तरीय हज प्रशिक्षण शिबिर दिग्रस येथे पार पडले. या शिबिरात ८० महिला व पुरुष हज यात्रेकरू सहभागी झाले होते. त्यांना फलक, साहित्य, ओव्हर हेड प्रोजेक्टरच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले आहे.

दिग्रस : जिल्हास्तरीय हज प्रशिक्षण शिबिर दिग्रस येथे पार पडले. या शिबिरात ८० महिला व पुरुष हज यात्रेकरू सहभागी झाले होते. त्यांना फलक, साहित्य, ओव्हर हेड प्रोजेक्टरच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले आहे.महाराष्ट्रासह केंद्रीय हज कमिटीने सर्व हज यात्रेकरूंसाठी प्रशिक्षण बंधनकारक केले आहे. त्यात विदेशी चलन, विमान प्रवास, पारपत्र, विमानतळावरील तपासणी, लगेज, आंतरराष्ट्रीय नियम, लसीकरण, मका व मदिना येथील मुक्काम तसेच विविध धार्मिक इसलामी महत्व, स्थळांचा इतिहास आदी बाबी माहिती देण्याचे आदेश आहे. या एक दिवसीय शिबिराच्या अध्यक्षस्थानी अंजूमन उर्दू संस्थेचे अध्यक्ष रफिक पहेलवान होते. कार्यक्रमाला पुसद अर्बन बँकेचे संचालक कुद्रूस मिर्झा, प्राचार्य मकसूद अहमद उपस्थित होते. यावेळी उमराह, तवाफ, सई, जमजम, हलक, हज, मिना, अरफाज, मुजदल्फा, रमी-जमरात, तवाफे जिरायत, तवाफे विदा, मदिना, अमराह, कुर्बानी आदी धार्मिक विधी बद्दल राज्य हज कमिटीचे जिल्हा प्रशिक्षक हाजी एजाजोद्दीन, हाजी मोहंमद निसार आणि महिलांना सालेहा नाहीद एजाजोद्दीन यांनी माहिती दिली. यावेळी जमीर खान व सुफी देशमुख यांनी प्रेषित स्तवन सादर केले. डॉ. सुरैय्या फातेमा व डॉ. फैजान बेग यांनी हज यात्रेकरूंची तपासणी केली. कार्यक्रमाला मजहर अहमद खान, मोहंमद शफीक, हसीन खान, मोहंमद मुद्दसर, साहेल जावेद, मोहंमद हनीफ, मसुद खान, मोहंमद नूर, म. नासीर, अहेमद खान, तनवीर बाबू, मुख्तार बाबू, हनुमान रामावत आदी उपस्थित होते. या शिबिरात यवतमाळ, वणी, उमरखेड, पुसद, दिग्रस, दारव्हा, आर्णी, नेर, महागाव, काळी दौलत, पांढरकवडा, घाटंजी, जांबबाजारसह नांदेड जिल्ह्यातील माहूर, वाईबाजार येथील हज यात्रेकरू उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)