ग्रामसेवकाला लाच घेताना पकडले

By Admin | Updated: August 23, 2015 02:35 IST2015-08-23T02:35:53+5:302015-08-23T02:35:53+5:30

वाघोली व केगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुनील विठ्ठल डवरे (३४) याला पाच हजार रुपयांची लाच घेताना शनिवारी येथे एका हॉटेलमध्ये रंगेहात पकडण्यात आले.

Gramsevak was caught taking bribe | ग्रामसेवकाला लाच घेताना पकडले

ग्रामसेवकाला लाच घेताना पकडले


पांढरकवडा : वाघोली व केगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुनील विठ्ठल डवरे (३४) याला पाच हजार रुपयांची लाच घेताना शनिवारी येथे एका हॉटेलमध्ये रंगेहात पकडण्यात आले.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर मंजूर करून देण्याची बतावणी करून एका ग्रामस्थाला या ग्रामसेवकाने पाच हजारांची लाच मागीतली. दरम्यान, ग्रामस्थाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. ठरल्यानुसार, हॉटेल मनोराज गार्डन बार अ‍ॅण्ड रेस्टारेंटमध्ये डवरे याने ग्रामस्थाला पैसे घेऊन बोलविले. त्याचेवळी डवरे याला पाच हजार रुपये देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सतीश देशमुख यांच्या मागदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, नरेंद्र इंगोले, अमित जोशी, अमोल महल्ले, अनिल राजकुमार, नीलेश पखाले यांनी पार पाडली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Gramsevak was caught taking bribe