शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

पोषण आहारात गौडबंगाल

By admin | Updated: October 14, 2014 23:24 IST

अंगणवाडीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात मोठ्या प्रमाणात गौडबंगाल होत असून १०० टक्के उपस्थिती असल्याचा देखावा निर्माण केला जातो. खरेच प्रत्येक अंगणवाडीत १०० टक्के उपस्थिती

रितेश पुरोहित - महागावअंगणवाडीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात मोठ्या प्रमाणात गौडबंगाल होत असून १०० टक्के उपस्थिती असल्याचा देखावा निर्माण केला जातो. खरेच प्रत्येक अंगणवाडीत १०० टक्के उपस्थिती असते काय हा संशोधनाचा विषय महागाव तालुक्यात झाला आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार राबविला जातो. महागाव तालुक्यात १६९ अंगणवाड्या आहेत. दररोज बालकांना एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागाच्या माध्यमातून पोषण आहार पुरविला जातो. त्यावर निरीक्षकांचे नियंत्रण असते. मात्र महागाव तालुक्यात असे कोणतेही नियंत्रण दिसत नाही. त्यामुळे पोषण आहार वितरणात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात अंगणवाडीवरील कार्यरत सेविकांच्या माध्यमातून पोषण आहार दिला जातो. पोषण आहार योग्य पद्धतीने तयार करून ठरलेल्या मोजमापाप्रमाणे बालकांना द्यावा, असा दंडक आहे. नेमका मोजमापाप्रमाणे पोषण आहार दिला जातो की नाही हे पाहण्याची जबाबदारी वरिष्ठांकडे आहे. परंतु याकडे कुणाचेही लक्ष नाही. केवळ कागदोपत्रीच पोषण आहार दिसत आहे. महागाव तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण अलिकडे वाढत असल्याचे दिसत आहे. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे १६९ अंगणवाड्यांमध्ये १०० टक्के उपस्थिती दाखविले जाते. नेमके किती विद्यार्थी असतात हे सर्व गावकऱ्यांना माहीत आहे. परंतु १०० टक्के उपस्थिती दाखवून गैरहजर विद्यार्थ्यांचा पोषण आहार हडपला जात आहे. मोठ्या प्रमाणात पोषण आहार शिल्लक असतो. मात्र कागदोपत्री उपस्थिती दाखवून पोषण आहार उचलला जात आहे. बहुतांश अंगणवाडीतील पोषण आहार काळ्याबाजारात विकला जातो. या सर्व प्रकाराच्या तक्रारी देऊनही अद्यापपर्यंत कुणावर कारवाई झाली नाही.