शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कर्मचारी मतदानाबाबत उदासीन

By admin | Updated: May 22, 2014 01:31 IST

मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रशासनाने मतदारांमध्ये जनजागृती करताना त्याची सुरुवात आपल्या शासकीय कर्मचार्‍यांपासून केली.

यवतमाळ : मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रशासनाने मतदारांमध्ये जनजागृती करताना त्याची सुरुवात आपल्या शासकीय कर्मचार्‍यांपासून केली. परंतु लोकसभा निवडणुकीत प्रशासनाला त्यात यश येऊ शकले नाही. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात १२ हजार कर्मचार्‍यांपैकी केवळ दोन हजार ६३ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

निवडणूक आयोगाने यावेळी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पुढाकार घेतला होता. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे आधी आपल्या कर्मचार्‍यांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी आयोगाने सोपविली होती. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी वेळोवेळी बैठका घेऊन आणि संधी मिळेल तेव्हा मतदानाच्या हक्काबाबत शासकीय कर्मचार्‍यांचे ‘ब्रेन वॉश’ करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर प्रत्येक विभाग प्रमुखांना आपल्या कर्मचार्‍यांचे मतदान करून घेण्याबाबत जबाबदारी दिली. मात्र त्यानंतरही प्रशासनाला अपेक्षेनुसार त्यात यश आलेले नाही. २00९ च्या तुलनेत पोस्टल बॅलेटची संख्या मात्र दुप्पट झाली आहे. तरुण मतदारांमध्ये मतदानाच्या हक्काबाबत जनजागृती झाली असली तरी शासकीय कर्मचार्‍यांमध्ये हा हक्क रुजविण्यात प्रशासन कमी पडले, असेच म्हणावे लागेल.

लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय कर्मचार्‍यांना अर्ज देण्यात आले होते. मतदान पोस्टल बॅटेलद्वारे करायचे की ईलेक्शन ड्युटी सर्टिफिकेटद्वारे याबाबत विचारणा करण्यात आली होती. मतदानाच्या वेळी यवतमाळ-वाशिममध्ये ११ ते १२ हजार शासकीय कर्मचार्‍यांची ड्युटी लावण्यात आली होती. त्यांच्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना पोस्टल बॅलेट पाठविण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात केवळ दोन हजार ६३ कर्मचार्‍यांनीच मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत नवृत्त साखर आयुक्त आणि सेवानवृत्त आयपीएस अधिकारी रिंगणात होते. त्यामुळे शासकीय कर्मचार्‍यांचा कल त्यांच्याकडे राहील, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात बसपा व भारिप-बमसंचे उमेदवार असलेल्या या नवृत्त अधिकार्‍यांना अनुक्रमे केवळ ८६ व २८ मते पडली. शासकीय कर्मचार्‍यांचा कलही शिवसेनेकडेच सर्वाधिक राहिला. सेना उमेदवाराच्या अर्धीही मते पोस्टल बॅलेटमधून काँग्रेसला मिळाली नाही. १४ उमेदवारांना तर शासकीय कर्मचार्‍यांनी स्पष्टपणे नाकारले. शासकीय कर्मचार्‍यांनी एक तर अर्ज भरुन परत आणले नाही आणि ज्यांनी अर्ज आणले त्यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडून पोस्टल बॅलेटची उचल केली नाही. यावरून त्यांची उदासीनता स्पष्ट होते. (प्रतिनिधी)