शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
2
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
3
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
4
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
5
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
6
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
7
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
8
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
9
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
10
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
11
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
12
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
13
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
14
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
15
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
16
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
17
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
18
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
19
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
20
अमित शाह फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक

पाणीटंचाईच्या नावानं गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 9:56 PM

संपूर्ण यवतमाळ शहर भीषण पाणीटंचाईने होरपळत आहे. अशा स्थितीत काहींनी स्वत:चे उखळ पांढरे करण्यास सुरुवात केली आहे. गोरगरीब कुटुंब पाणी विकत घेऊ शकत नाही. अशांना मदत करण्यासाठी आम्ही झटतोय, असा देखावा करून बकळ अशी लोकवर्गणी दात्यांकडून जमा केली जात आहे.

ठळक मुद्देनवीन फंडा : अंधार होताच टँकरवर लागतात बॅनर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण यवतमाळ शहर भीषण पाणीटंचाईने होरपळत आहे. अशा स्थितीत काहींनी स्वत:चे उखळ पांढरे करण्यास सुरुवात केली आहे. गोरगरीब कुटुंब पाणी विकत घेऊ शकत नाही. अशांना मदत करण्यासाठी आम्ही झटतोय, असा देखावा करून बकळ अशी लोकवर्गणी दात्यांकडून जमा केली जात आहे. टंचाई वेगवेगळ्या पद्धतीने कॅश करण्याचा नवीन फंडा काहींनी शोधला आहे.पाणी हे जीवन आहे. त्याचं दान करून पुण्य कमावण्यासाठी अनेकजण दातृत्वाचा भाव घेवून झटत आहे. काहींनी तर या टंचाईतही स्वत:कडे असलेले पाण्याचे साठे मोफत उपलब्ध करून दिले आहे. शक्य होईल तेवढ्यांना पाणी पुरविण्याची जबाबदारी माणुसकी म्हणून केली जात आहे. मात्र यालाही अपवाद ठरणारे महाभाग टाळूवरचं लोणी खाण्याच्या मानसिकतेतून पाणीटंचाईत स्वत:ची चांदी कशी होईल यासाठी व्यूहरचना आखत आहे. यामध्ये सामाजिक समतेचा डांगोरा पिटणारे तसेच लोकनेता असलेल्याचे भासविणारे काही नगरसेवकही समाविष्ट आहे. पालिकेकडून मिळालेले टँकर फिरल्यानंतर रात्री त्यावर स्वत:च्या नावाचे फलक लावून पाण्याचे वाटप केले जाते. काही ठिकाणी तर परस्परच शासकीय खर्चाने भरलेल्या टँकरची रोखीत विक्री केली जाते. हा गोरखधंदा सध्या जोरात असून गोरगरीबांच्या पाण्याच्या नावाने मोठ्या प्रमाणात चंदा वसूल केला जात आहे.नगरपरिषदेच्या पाण्याचे स्त्रोत झपाट्याने कोरडे पडत असले तरी बांधकामासाठी विशिष्ट वेळेनंतर टँकर भरून त्याची विक्री केली जात आहे. यासाठी एक टोळके सक्रिय झाले असून टंचाईच्या काळात स्वत:ची झोळी भरण्यात मग्न आहेत. अशा संधीसाधूमुळे प्रामाणिकपणे काम करणारा कर्मचारीवर्ग, नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांनाही जनतेच्या रोषाचा सामना करावा लागतो. टंचाईने सर्वच जण तणावग्रस्त असून मानापमान सहन करून अनेक घटक सेवा देण्यात व्यस्त आहेत. दुर्दैवाने त्यांच्या भरोशावर दुकानदारी करणारे पैसा गोळा करताना दिसत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई