अडगळीत पडली शासकीय वाहने

By Admin | Updated: May 16, 2016 02:38 IST2016-05-16T02:38:09+5:302016-05-16T02:38:09+5:30

शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयातील जुनी शासकीय वाहने जीर्ण झाली आहे. ही वाहने आता भंगारात जमा झाली आहे़

Gone are the government vehicles | अडगळीत पडली शासकीय वाहने

अडगळीत पडली शासकीय वाहने

लिलावाची प्रतीक्षा : वाहनांवर चोरट्यांची नजर, अनेक सुटे भाग झाले हडप
वणी : शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयातील जुनी शासकीय वाहने जीर्ण झाली आहे. ही वाहने आता भंगारात जमा झाली आहे़ मात्र अद्याप त्यांचा लिलाव न झाल्याने अनेक कार्यालयात ही वाहने अडगळीत पडून असल्याने त्यांची अडचण होत आहे.
येथील पाटबंधारे विभाग, तहसील, पोलीस ठाणे, आरोग्य विभाग आदी शासकीय कार्यालयांत जुनी शासकीय वाहने गेल्या कित्येक महिन्यांपासून पडून आहेत़ पोलीस ठाण्यात तर शासकीय वाहनासोबतच जप्त केलेल्या वाहनांचा ढीग लागलेला आहे. काही वाहने पोलीस ठाण्यात जागा नसल्याने बसस्थानक व इतर ठिकाणी ठेवण्यात आली आहे.
ही वाहने आता अतिशय जीर्ण झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही वाहने एकाच ठिकाणी उभी आहे़ अधिकाऱ्यांना तालुका ठिकाणी दौरा करण्यासाठी व इतर शासकीय कामांकरिता शहरातील बहुतांश कार्यालयात शासनाने वाहने उपलब्ध करून दिली आहे़ या जुन्या वाहनांची वयोमर्यादा संपल्याने आता शासनाने नवीन वाहने अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे़ त्यामुळे जुनी वाहने आता अतिशय जीर्ण होऊन भंगारात जमा झाली आहे. जुन्या वाहनांकडे कुणाचेही लक्ष जात नसून अनेक वाहने कार्यालयाच्या मागील बाजूने एखाद्या झाडाखाली धूळ खात पडून आहे़ वाहनासोबतच अनेक मशिनरीसुद्धा भंगार अवस्थेत पडून आहे.
येथील पाटबंधारे कार्यालयातील भंगार वाहन एका झाडाखाली ठेवण्यात आले आहे़ ते वाहन अतिशय जीर्ण झाले आहे. त्यावर प्रचंड धूळ साचून आहे़ त्याचबरोबर वाहनाच्या आजूबाजूला झाडाझुडुपाने वेढा दिला आहे़ त्यामुळे त्या वाहनाकडे कुणीच ढुंकूनही पाहत नाही, हेच वास्तव आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Gone are the government vehicles