शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहिरींचे पैसे शेतकऱ्यांना तत्काळ देऊ

By admin | Updated: August 3, 2014 00:19 IST

रखडलेल्या सिंचन विहिरींचे पैसे शेतकऱ्यांना तत्काळ देऊ, तशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे. याशिवाय विद्यार्थ्यांची परवड होऊ नये, यासाठी वसतिगृह प्रवेशाची मुदत १० आॅगस्टपर्यंत

पालकमंत्री : वसतिगृह प्रवेशाला मुदतवाढयवतमाळ : रखडलेल्या सिंचन विहिरींचे पैसे शेतकऱ्यांना तत्काळ देऊ, तशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे. याशिवाय विद्यार्थ्यांची परवड होऊ नये, यासाठी वसतिगृह प्रवेशाची मुदत १० आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत सांगितले.पालकमंत्री मोघे पुढे म्हणाले, यवतमाळ जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला. त्यामुळे पाणीटंचाई योजनांना ३० आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. नाफेडने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसे पाच महिन्यांपासून दिले नाही. त्यामुळे शासनाने त्यांना ५० कोटी रुपये उपलब्ध करून दिले. लवकरच नाफेड शेतकऱ्यांना शेतमालाचे पैैसे वितरित करेल.जिल्ह्याच्या प्रश्नांवर बोलताना वणी येथे ओव्हरलोड वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना तेथे स्वतंत्र पोलीस पथक नेमून वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. उमरखेड तालुक्यातील कोर्टा हे गाव पैनगंगा अभयारण्यात येते. त्यामुळे तेथे २८ किलोमीटर डांबरीकरण रस्ता बांधकामाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर पर्याय शोधत तेथे खडीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. ढाणकी येथील दारू दुकानाबाबत तक्रार करण्यात आली होती. त्याची चौकशी लावली. जिल्ह्यात पाणीपुरवठ्याच्या योजना १० टक्के लोकसहभागाच्या पैशामुळे रखडल्या होत्या. आता ही अट रद्द करण्यात आल्याचेही ते म्हणाले. पत्रपरिषदेला प्रभारी जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा नियोजन अधिकारी सिडाम, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)