शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पासाठी मिळणार निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचावे तसेच अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवश्यक निधी देण्याची ग्वाही दिली. याशिवाय जिल्ह्याच्या विविध समस्यांबाबतही सखोल आढावा घेतला.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची ग्वाही : जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचावे तसेच अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवश्यक निधी देण्याची ग्वाही दिली. याशिवाय जिल्ह्याच्या विविध समस्यांबाबतही सखोल आढावा घेतला.विधिमंडळ सभागृहात सोमवारी जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी डॉ.वजाहत मिर्झा, ख्वाजा बेग, अ‍ॅड. नीलय नाईक, संजय राठोड, अ‍ॅड. इंद्रनील नाईक, मदन येरावार, डॉ. संदीप धुर्वे, प्राचार्य डॉ. अशोक उईके, नामदेव ससाणे, संजीवरेड्डी बोदकुरवार या आमदारांसह किशोर तिवारी उपस्थित होते.अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासकीय मदतीचा निधी जिल्ह्यांना पोहोचला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १०२ कोटींचे वाटप झाले असून दुसऱ्या टप्प्यात २२२ कोटींची मदत वाटप सुरू आहे.जिल्ह्यातील जलसंधारणाच्या प्रकल्पांची प्रगती, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतीतील रस्त्यांची स्थिती, दुरुस्ती व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांची सद्यस्थिती, जिल्ह्यातील अपूर्ण जलसिंचन प्रकल्पाचा आढावा, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, कृषी पंपाचा विज पुरवठा, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, मुख्यमंत्री पेयजल योजना आदींबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी माहितीदिली.आमदारांनी मांडल्या जिल्ह्यातील समस्यायावेळी आमदारांनी सिंचन, रस्ते, अपूर्ण प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी, अल्पसंख्यांकाबाबतचा निधी, शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा करणे, खनिज विकास निधी, पैनगंगा अभ्यायारण्यातील ४० गावांतील रस्त्यांचा प्रश्न, वसंतराव नाईक स्मृती स्थळासाठी निधी, पॉवर ग्रीडसाठी जमीन भूसंपादन, माळपठारावरील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी तोडगा काढणे आदी समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास