शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य, समता, बंधुता ही बुद्ध तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे

By admin | Updated: April 10, 2015 00:13 IST

मानव हा धर्मासाठी नाही. स्वातंत्र्य, समता, बुधंता ही बुद्ध तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. इसादास भडके यांनी केले.

पुसद : कोणताही धर्म हा मानवाच्या कल्याणासाठी आहे. मानव हा धर्मासाठी नाही. स्वातंत्र्य, समता, बुधंता ही बुद्ध तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. इसादास भडके यांनी केले. ते गुरुवारी धम्मक्रांती प्रज्ञापर्वाच्या द्वितीय पुष्प गुंफताना बोलत होते.महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने गुरुवारी दुसऱ्या दिवशी ‘मी धम्ममार्गी का झालो’ या विषयावर आयोजित परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक चळवळीचे नेते अ‍ॅड. आप्पाराव मैंद होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कादंबरीकार संतोष पवार, ज्ञानेश्वर तडसे, आशाताई चापके, आशाताई कदम, नितीन पवार, दिनकर गोस्वामी, प्रा. हसनैन खान, गोवर्धन मोहिते, विकास जामकर, प्रा.डॉ. वंदना फुंडकर, अण्णा दोडके, सूर्यभान कांबळे आदींची उपस्थिती होती. यावेळी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने प्रबोधनपर नाटिकाही सादर करण्यात आली. पुढे बोलताना प्रा. इसादास भडके म्हणाले, आज मानवी हक्काचे जे आंतरराष्ट्रीय मानक ठरले आहे, विविध देशांच्या राज्य घटनांमध्ये ज्या मानवतावादी गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला, त्या सगळ्या जीवनमूल्यांचा समावेश फ्रेंच राज्यक्रांतीच्या कितीतरी आधी बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये केलेला आढळतो. जगात हिंसाचाराचा जो भयावह प्रकार सुरू आहे, त्याला केवळ बौद्ध तत्त्वज्ञानानेच थांबविता येऊ शकते. यावेळी उपस्थित इतर मान्यवरांनीसुद्धा विचार व्यक्त केले. प्रज्ञापर्व आयोजन समितीचे अध्यक्ष शीतलकुमार वानखडे, किशोर मुजमुले, गौतम सूर्यवंशी, अ‍ॅड. वाय.एन. जांभुळकर, मिलिंद हाटेकर, मनोज खिराडे, भीमराव उमरे, सुभाष गायकवाड, नारायण ठोके, मिलिंद सुरडकर, शशांक भरणे, बाळासाहेब कांबळे, जगदीश सावळे, आनंद नरवाडे, मंदा डांगरे, संघपाल आडोळे, विलास भवरे, प्रा. महेश हंबर्डे, भगवान हनवते, प्रा. दादाराव अगमे, शरद टेंबरे, संतोष गायकवाड, किशोर मनवर, अशोक वाहुळे, आर.एस. रायबोले, राजेंद्र वाघमारे आदींसह असंख्य नागरिकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)