शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचे चार बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 05:00 IST

दिवसभरात ४९ पुरुष आणि २४ महिलांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यात आर्णी ४, दारव्हा ४, दिग्रस ४, महागाव १, मारेगाव ६, नेर ५, पांढरकवडा १, पुसद ९, उमरखेड ३, वणी ९, यवतमाळ १४, झरी जामणी ११ व अन्य शहरातील दोन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६ लाख २६ हजार ५७० नागरिकांच्या चाचण्या झाल्या. त्यापैकी पाच लाख ५२ हजार ९३३ अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली. 

ठळक मुद्देकेवळ ७३ नवे रुग्ण : दिवसभरात ३०१ रुग्ण कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळेच मंगळवारी चार हजार अहवालांपैकी केवळ ७३ पाॅझिटिव्ह आले तर दिवसभरात तब्बल ३०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकीकडे हे दिलासादायक चित्र असले तरी मंगळवारी चार जणांचा बळीही नोंदविला गेला. मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यवतमाळ शहरातील ६० वर्षीय महिला, तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष, दारव्हा शहरातील ६५ वर्षीय महिला आणि खासगी रुग्णालयात पांढरकवडा तालुक्यातील ८४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. दिवसभरात ४९ पुरुष आणि २४ महिलांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यात आर्णी ४, दारव्हा ४, दिग्रस ४, महागाव १, मारेगाव ६, नेर ५, पांढरकवडा १, पुसद ९, उमरखेड ३, वणी ९, यवतमाळ १४, झरी जामणी ११ व अन्य शहरातील दोन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६ लाख २६ हजार ५७० नागरिकांच्या चाचण्या झाल्या. त्यापैकी पाच लाख ५२ हजार ९३३ अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली. 

दिवसभरात चार हजारांवर अहवाल निगेटिव्ह - मंगळवारी ४२३३ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात १२५२ सक्रीय रुग्ण आहे. त्यापैकी ५७९ रुग्णालयात तर ६७३ गृहविलगीकरणात आहे. एकूण बाधितांची संख्या ७१ हजार ९९७ तर एकूण कोरोनामुक्त रुग्णसंख्या ६८ हजार ९७७ आहे. आतापर्यंत १७६८ जणांचा कोरोनाने बळी घेतला. सध्या जिल्ह्याचा पाॅझिटिव्हीटी दर ११.४९ तर मृत्यू दर २.४६ आहे.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या