शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात चार जनावरे ठार

By admin | Updated: November 8, 2014 22:44 IST

शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या चार वगारी बिबट्याने शुक्रवारी रात्री ठार मारल्या. विशेष म्हणजे गावकऱ्यांनी पिटाळून लावलेला बिबट घटनास्थळी वारंवार येत असल्याने नागरिकांमध्ये

सोनखास : शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या चार वगारी बिबट्याने शुक्रवारी रात्री ठार मारल्या. विशेष म्हणजे गावकऱ्यांनी पिटाळून लावलेला बिबट घटनास्थळी वारंवार येत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. या प्रकारामुळे जामवाडी येथील नागरिकांनी रात्र जागून काढली. दीपक कालोकार यांच्या मालकीच्या या वगारी आहेत. रात्री ८.३० च्या सुमारास त्यांचा गडी मोहन धराडे हा शेतात गेला असता त्याला चार वगारी मारलेल्या आढळून आल्या. शिवाय बिबट्याही त्याला दिसला. ही बाब त्याने कालोकार यांना येऊन सांगितली. लगेच गावकरी शेताकडे धावले, त्याहीवेळी बिबट तेथे होता. वारंवार पिटाळून लावल्यानंतर तो वगारीजवळ येत होता. रात्री ९.३० वाजतापर्यंत हा प्रकार चालला. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक पी.एस. यादव, पी.एम. लांडगे, पी.सी. मेश्राम घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान पशुचिकित्सालयाचे डॉ.एच.पी. ढोले, डॉ.आर.बी. भटारकर यांनी वगारांची शवचिकित्सा केली. यानंतर या वगारी शेतातच पुरण्यात आल्या. सदर घटनेमुळे पशुधन पालकांसह नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. (वार्ताहर)