शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

प्राधिकरणापासून हाकेच्या अंतरावर नळाच्या पाण्याची वाहतेय गंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 06:00 IST

नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी प्राधिकरणाने खोदकाम केले. यंत्राच्या सहाय्याने काम करताना घरगुती पाईपलाईन उखडल्या गेल्या. त्या जोडण्याचे सौजन्यही या विभागाने दाखविले नाही. तुटलेल्या पाईपला प्लास्टिकचे पाईप जोडून घरापर्यंत पाणी नेण्याचा प्रयत्न नागरिकांकडून झाला. मात्र मुख्य पाईपही फुटले असल्याने त्यांचा हा प्रयोगही अयशस्वी ठरत आहे. या भागातील नागरिकांकडे पिण्याच्या पाण्यासाठी प्राधिकरणाचे पाणी हाच एकमेव स्रोत आहे.

ठळक मुद्देनागरिक पाण्यापासून वंचित । दोन आठवड्यांपासून नळाला थेंबही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुर्लक्षितपणाची मालिकाच जणू या विभागाने सुरू केली आहे. विविध तांत्रिक कारणे पुढे करून पाणीपुरवठ्यात अनियमितता आणली गेली आहे. आता प्राधिकरणानेच केलेल्या कामामुळे नागरिकांना नळाच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. बाजोरियानगर, विदर्भ हाऊसिंग सोसायटीतील शेकडो नागरिक या प्रश्नाचे बळी पडले आहेत.नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी प्राधिकरणाने खोदकाम केले. यंत्राच्या सहाय्याने काम करताना घरगुती पाईपलाईन उखडल्या गेल्या. त्या जोडण्याचे सौजन्यही या विभागाने दाखविले नाही. तुटलेल्या पाईपला प्लास्टिकचे पाईप जोडून घरापर्यंत पाणी नेण्याचा प्रयत्न नागरिकांकडून झाला. मात्र मुख्य पाईपही फुटले असल्याने त्यांचा हा प्रयोगही अयशस्वी ठरत आहे. या भागातील नागरिकांकडे पिण्याच्या पाण्यासाठी प्राधिकरणाचे पाणी हाच एकमेव स्रोत आहे. नळालाच पाणी नसल्याने त्यांना भटकंती करावी लागत आहे. हातपंप, विहीर आदी स्रोत घराच्या आसपास नाही. पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी प्राधिकरणावर आपला रोष व्यक्त केला. मात्र या विभागातील अधिकाऱ्यांनी नागरिकांची ही समस्या गांभीर्याने घेतली नाही.खोदकाम करत असताना घरगुती पाईपलाईन फुटू नये यासाठी कुठलीही दक्षता घेतली जात नाही. शहराच्या अनेक भागातील नागरिकांना या प्रश्नाला सामोरे जावे लागले आहे. विकास कामे करताना नागरिकांची साथ मिळत असली तरी त्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी संबंधित विभाग उदासीन असल्याचे दिसून येते. शहरात भूमिगत गटार योजनेच्या कामातही असाच प्रकार सुरू आहे. संबंधित अभियंत्यांना सूचना केल्यानंतरही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या संतापाचा बांध फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अभियंत्यांची टोलवाटोलवीयवतमाळ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वेगवेगळ्या परिसरासाठी अभियंत्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. चापडोह प्रकल्पावरून घेतलेले पाणी पुरवठ्याची जबाबदारी असलेले अभियंता तर चक्क वॉलमनचे नाव सांगून मोकळे होतात. कुठलीही तक्रार ते गांभीर्याने घेत नाहीत.

टॅग्स :Waterपाणी