शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

पहिला पॉझिटिव्ह झाला ठणठण; स्वत:सह कुटुंबाची घेतोय काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 05:00 IST

सुरुवातीला कोरोनाबाबत समाजात व यंत्रणेत प्रचंड भीती होती. त्यामुळे अनेकजण फोन करणेही टाळत होते. रुग्णालयात केवळ तिघेच असल्याने योग्य उपचार मिळाला. डॉक्टर व आरोग्य यंत्रणेकडून पुरेपूर सहकार्य मिळाले. काही दिवस समाजात वावरताना अंतर राखत असल्याचे दिसत होते. आता स्थिती पूर्वपदावर असल्याचा चांगला-वाईट अनुभव पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाने सांगितला. 

ठळक मुद्देकोरोनापूर्वी असलेला खोकल्याचा त्रासही कमी, दुरावलेले नातलग, मित्रमंडळ परतले

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्रात पुणे, मुंबई या महानगरांपाठोपाठ यवतमाळात सर्वप्रथम कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. विदेशात पर्यटनासाठी गेलेल्या ग्रुपमधील एक जण पॉझिटव्ह आल्यानंतर त्याची तपासणी झाली. ही माहिती मुंबईवरून यवतमाळ जिल्हा प्रशासनाला मिळाली. त्या कुटुंबाचा शोध घेवून १२ मार्चला त्यांना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले. १५ दिवस रुग्णालयात आणि २० दिवस गृहविलगीकरणात राहल्यानंतर आता या पहिल्या पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. दहा महिन्यांच्या काळात त्यांना इतर कुठलाही त्रास झाला नाही. सुरुवातीला कोरोनाबाबत समाजात व यंत्रणेत प्रचंड भीती होती. त्यामुळे अनेकजण फोन करणेही टाळत होते. रुग्णालयात केवळ तिघेच असल्याने योग्य उपचार मिळाला. डॉक्टर व आरोग्य यंत्रणेकडून पुरेपूर सहकार्य मिळाले. काही दिवस समाजात वावरताना अंतर राखत असल्याचे दिसत होते. आता स्थिती पूर्वपदावर असल्याचा चांगला-वाईट अनुभव पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाने सांगितला. 

पहिला रुग्ण कसा ट्रेस झाला? उपचार कसे झाले?जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मुंबई येथे ट्रेस झाला. दुबईवरून आलेल्या ग्रुपमध्ये यवतमाळातील तिघांचा समावेश होता. त्यात पुण्यातील एकजण पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांचीच चाचणी झाली. यवतमाळात १२ मार्च रोजी या दाम्पत्याची तपासणी केली. त्यात पती-पत्नी पॉझिटव्ह आले, तर मुलगा पुणे येथे थांबल्याने तेथे तो पाॅझिटिव्ह आला. कुटुंबात पत्नी, मुलगा दोघेही आढळले पॉझिटिव्ह  पर्यटनासाठी बाहेरदेशात गेलेल्या कुटुंबातील तीनही सदस्य पॉझिटिव्ह आढळले. त्यात ५७ वर्षीय वडील, ५५ वर्षीय आई व २७ वर्षीय मुलगा या तिघांनाही सर्दी, ताप, खोकला ही कोरोनाची लक्षणे आढळली. विदेश प्रवासाची पार्श्वभूमी असल्याने अगदी सुरुवातीलाच त्यांची चाचणी करण्यात आली. त्यात हे कुटुंबच पॉझिटिव्ह आले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या