शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

वणीत सहा दुकाने बेचिराख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 06:00 IST

आगीचे लोळ वीज तारांपर्यंत पोहोचल्याने वीज तारांमधून मोठ्या प्रमाणावर आगीच्या ठिणग्या पडल्या. त्यामुळे परिसरातील लोक भितीने सैरावैरा पळत होते. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी तातडीने त्या भागातील वीज पुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला. वणी शहरात मंगळवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सभा पार पडली.

ठळक मुद्देसिलिंडरचा स्फोट : गॅस गळतीने घडली दुर्घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास स्थानिक एकतानगरमधील एका दुकानात सिलिंडरमधील गॅस गळती झाल्याने सदर दुकानाने पेट घेतला. पाहतापाहता या आगीने अवतीभवतीच्या पाच दुकानांना आपल्या विळख्यात घेतले. या आगीत दुकानातील सिलिंडरचा स्फोटही झाला. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. या आगीत पाच लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाने पराकोटीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.आगीचे लोळ वीज तारांपर्यंत पोहोचल्याने वीज तारांमधून मोठ्या प्रमाणावर आगीच्या ठिणग्या पडल्या. त्यामुळे परिसरातील लोक भितीने सैरावैरा पळत होते. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी तातडीने त्या भागातील वीज पुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला. वणी शहरात मंगळवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सभा पार पडली. या सभेची गर्दी रस्त्याने परत जात असतानाच एकतानगरमधील मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या एका चिकन विक्रीच्या दुकानातील सिलिंडरमधून गॅस गळती सुरू झाली. त्यामुळे सिलिंडरने पेट घेऊन संपूर्ण दुकान आगीच्या विळख्यात सापडले. आग इतकी भीषण होती की, काही वेळातच दुकानातील सिलिंडरचा स्फोट झाला आणि अवतीभवतीच्या पाच दुकानांनाही आगीने विळखा घातला. या आगीत शब्बीर नामक इसमाचे चिकन विक्री सेंटर, शबाना निझाम शेख यांचे हॉटेल, मालाबाई यांचे झुणका भाकर केंद्र, तोहसीन शेख यांचे दूध विक्री केंद्र, नानाजी काळे यांचे सलून, ऋषी पेंदोर यांचे कापड प्रेसचे दुकान जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच वणी नगरपालिकेचे अग्नीशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. अग्नीशमन दलाने अर्धा तास अथक परिश्रम घेऊन या आगीवर नियंत्रण मिळविले.

टॅग्स :fireआग