घोन्सा येथील ऑटोमोबाईलला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 15:52 IST2020-01-06T15:50:47+5:302020-01-06T15:52:19+5:30

घोन्सा येथील उपसरपंच अनिल साळवे यांच्या ऑटोमोबाईलला रविवारी रात्री अचानक आग लागली.

Fire breaks out at an automobile in Ghonsa | घोन्सा येथील ऑटोमोबाईलला भीषण आग

घोन्सा येथील ऑटोमोबाईलला भीषण आग

यवतमाळ: यवतमाळ तालुक्यातील घोन्सा येथील उपसरपंच अनिल साळवे यांच्या ऑटोमोबाईलला रविवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत 7 लाख 20 हजार रुपयांचे  नुकसान झाले.

घोन्सा येथील मुख्य मार्गावर अनिल साळवे यांचे ऑटोमोबाईल आहे. रविवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला अचानक आग लागली. ही बाब शेजारी असलेल्या दौलत बरतीने यांच्या लक्षात आल. त्यानंतर त्यांनी अनिल साळवे याना घटनेची माहिती दिली. त्यानंतर ते दुकानाकडे गेले असता आगीने रौद्र रूप धारण केले. यावेळी गावकऱ्यांनी पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळविले मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य जाळून खाक झाले. याबाबत वणी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनना फोनद्वारे माहिती देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही त्यामुळे अखेर गावकऱ्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले.

Web Title: Fire breaks out at an automobile in Ghonsa