शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कचरा स्वच्छतेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 05:00 IST

‘लोकमत’ने गेल्या काही दिवसांपासून हा प्रश्न लावून धरला होता. शुक्रवारी संतप्त नगरसेवकांनी कचरा प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन अडविले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कचरा फेकला. याची गंभीर दखल घेत   जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील कचरा हटविण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले. नगरपरिषद प्रशासनाकडून  कचरा उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. ठिकठिकाणी कचरा साचला आहे. यातून जलजन्य व बुरशीजन्य आजार पसरण्याचा धोका आहे.

ठळक मुद्देयवतमाळ पालिका लागली कामाला : २० ट्रॅक्टर, २५० कर्मचारी जुंपले, कचरा उचलला, पण डम्पिंग यार्डमध्ये वाहन शिरेना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील कचरा प्रश्नाची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने सफाई कंत्राटदाराला तत्काळ काम सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे शनिवारपासून कामाला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी २० ट्रॅक्टर, दोन जेसीबी, दोन टिपर, २५०   कामगारांद्वारे कचरा टाकण्याचे काम सुरू झाले.  ‘लोकमत’ने गेल्या काही दिवसांपासून हा प्रश्न लावून धरला होता. शुक्रवारी संतप्त नगरसेवकांनी कचरा प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन अडविले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कचरा फेकला. याची गंभीर दखल घेत   जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील कचरा हटविण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले. नगरपरिषद प्रशासनाकडून  कचरा उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.ठिकठिकाणी कचरा साचला आहे. यातून जलजन्य व बुरशीजन्य आजार पसरण्याचा धोका आहे. तो  लक्षात घेत नगरसेवकांनी निषेध नोंदविला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेला शुक्रवारी काम सुरू करण्याचे आदेश दिले. प्रत्येक प्रभागात सफाईसाठी कर्मचारी पोहोचले. त्यांनी प्रथम मोठ्या रस्त्यावरील कचरा उचलण्याचे काम हाती घेतले. यासोबतच सुस्थितीत असलेल्या घंटागाड्या आणि ॲपेची मदत घेण्यात आली. काही वाहने नादुरुस्त आहेत. ती तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी नगर परिषदेकडे केली आहे. तत्पूर्वी शहरातील कचरा हटविण्यासाठी अमरावतीवरून १५ ट्रॅक्टर कंत्राटदार आणणार आहेत. डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा टाकण्यासाठी जाताच येत नाही. कचरा घेऊन जाणारी वाहन या ग्राउंडच्या बाहेर थांबली होती. 

जिल्हाधिकाऱ्यांची तत्परता- शहरातील अस्वच्छतेची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. शुक्रवारीच तब्बल दहा कोटींच्या कामांना मंजुरी मिळविण्यासाठी त्यांनी तत्परता दाखविली. दहा कोटींची कामे मंजूर करण्याचे अधिकार अमरावती येथील जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांना आहे. मात्र शहराची समस्या जाणून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपले अमरावतीमधील स्त्रोत वापरुन एकाच दिवशी दहा कोटींची कामे मंजूर करवून घेतली. लगेच प्रशासकीय मान्यता आणि कार्यादेशही दिले. यासाठी त्यांनी अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतानाच्या वैयक्तिक संबंधांचा वापर केला. 

निविदा प्रक्रिया, ठराव आणि वर्क ऑर्डर झाली आहे. शहरातील स्वच्छतेला सुरुवात झाली आहे. संपूर्ण प्रक्रिया सुस्थितीत आणण्यासाठी पाच ते सात दिवस लागतील. त्यानंतर स्वच्छता नियमित प्रक्रियेत येईल. कुठेही हयगय न करता शहरात स्वछता ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.- अमोल येडगे, जिल्हाधिकारी

टॅग्स :dumpingकचराcollectorजिल्हाधिकारी