शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

नळाचे मीटर व पेटी खरेदीवरून आरोपांच्या फैरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 06:00 IST

पाणी मीटर बसविण्याच्या निवेदनाप्रमाणे प्राकलनात नमूद बाबींची अपूर्तता, मीटर जोडणी साहित्यात, नकाशात तफावत, ५० लाख रुपयांचा नगरपंचायतला नाहक भुर्दंड, पाणी मीटरचा सुमार दर्जा, प्लास्टिकचे मीटर व पेटी आदींबाबत आक्षेप असल्याचे नोंदविण्यात आले आहे. यात घोटाळा करण्यात आल्याने पुरवठादाराचे देयक थांबविण्यात यावे, असे तक्रारीत म्हटले आहे.

ठळक मुद्देराळेगाव नगरपंचायत : सुमार दर्जाचे साहित्य, कंत्राटदाराचे देयक थांबविण्याची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : येथील नगरपंचायतीत ५० लाख रुपयांचे एक हजार २०० पाणी मीटर खरेदी करण्यात आले आहे. यावरून विरोधक व सत्तारूढ यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडू लागल्या आहेत.विरोधी नगरसेवक बबनराव भोंगारे, बांधकाम सभापती भालचंद्र कवीश्वर, किशोर जुनुनकर, छायाताई पिंपरे, अरुण शिवनकर, सविता पोटदुखे, वनिता दुर्गे आदींनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून चौकशी व कारवाईची मागणी केली आहे.पाणी मीटर बसविण्याच्या निवेदनाप्रमाणे प्राकलनात नमूद बाबींची अपूर्तता, मीटर जोडणी साहित्यात, नकाशात तफावत, ५० लाख रुपयांचा नगरपंचायतला नाहक भुर्दंड, पाणी मीटरचा सुमार दर्जा, प्लास्टिकचे मीटर व पेटी आदींबाबत आक्षेप असल्याचे नोंदविण्यात आले आहे. यात घोटाळा करण्यात आल्याने पुरवठादाराचे देयक थांबविण्यात यावे, असे तक्रारीत म्हटले आहे.या संदर्भात नगरपंचायतच्या अध्यक्ष मालाताई खसाळे म्हणाल्या, नगरोत्थान योजनेंतर्गत पाणी मीटर बसविण्याबाबत २३ जानेवारी २०१८ रोजी नगरपंचायतीत ठराव घेण्यात आला होता. या ठरावाचे सूचक तत्कालीन उपाध्यक्ष व पाणीपुरवठा सभापती अ‍ॅड. प्रफुल्ल चव्हाण, तर अनुमोदक अरुण शिवनकर होते. बबन भोंगारे अध्यक्ष असताना हा ठराव घेण्यात आला होता. तक्रारकर्ते व अधिकारी यांच्या निरसन झाल्यानंतर मीटर लावण्याबाबत ठरविले जाईल, पुरवठादाराला देयक देण्याबाबत मुख्याधिकारी निर्णय घेतील.