लोकमत न्यूज नेटवर्कवणी : संपूर्ण यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, या मागणीसाठी वणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमरण उपोषण सुरू आहे. बुधवारी उपोषणाचा तिसरा दिवस होता. मात्र प्रशासनाने अद्याप या उपोषणाची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, दुपारी दोन दिवसांनंतर उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यातील चारजणांची प्रकृती खालावल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्वात ७० शेतकरी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाला वणीतील डॉक्टर असोसिएशन, वकील संघटना यासह विविध संघटनांनी बुधवारी आपला पाठिंबा जाहीर केला. मात्र प्रशासनाने या उपोषणाकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप डॉ. महेंद्र लोढा यांनी केला आहे. ते म्हणाले, की वणी मारेगाव झरी तालुक्यात शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत. बुधवारी ठाणेदार बाळासाहेब खाडे व महसूल अधिकाऱ्यांनी मंडपाला भेट दिली. उपोषणकर्त्यांची चर्चा केली. मात्र त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलन उग्र होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे उपोषण चवथ्या दिवशी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:40 IST
संपूर्ण यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, या मागणीसाठी वणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमरण उपोषण सुरू आहे. बुधवारी उपोषणाचा तिसरा दिवस होता. मात्र प्रशासनाने अद्याप या उपोषणाची कोणतीही दखल घेतली नाही.
राष्ट्रवादीचे उपोषण चवथ्या दिवशी कायम
ठळक मुद्देअद्याप तोडगा नाही : उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, रूग्णालयात हलविले