शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 06:00 IST

पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापसाचे पीक महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. नगदी पीक म्हणून गणल्या जाणाऱ्या या पांढऱ्या सोन्याचे यंदा परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले. उत्पादनही घटले आहे. त्यामुळे यंदा कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

ठळक मुद्देकेंद्र सुरू करण्याची मागणी : महागाव तालुक्यात व्यापाऱ्यांकडून लूट

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : दिवाळी आटोपून १५ दिवस लोटले तरी अद्यापही कापसाचे शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे खासगी व्यापारी शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या लूट करीत आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कमी भावात कापूस विकावा लागत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने कापूस खरेदी केंद्रसुरू करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापसाचे पीक महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. नगदी पीक म्हणून गणल्या जाणाऱ्या या पांढऱ्या सोन्याचे यंदा परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले. उत्पादनही घटले आहे. त्यामुळे यंदा कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना सावकार व खासगी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.दरवर्षी विजयादशमीला निघणारा कापूस यंदा पावसामुळे शेतकºयांच्या घरी उशिराने येत आहे. आपली गरज भागवण्यासाठी कास्तकार कापूस कमी भावात विकू लागले आहे. खासगी व्यापारी मात्र हा कापूस बेभाव गिळंकृत करीत असल्याने कापूस पणन महासंघाने व सीसीआयने खरेदी केंद्र सुरू करून शेतकºयांना न्याय देण्याची मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.यंदा महागाव तालुक्यात २५ हजार हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. यवतमाळ जिल्हा हा कापसाचा जिल्हा म्हणून राज्यासह देशात ओळखला जातो. परंतु जिल्ह्यातील पांढरे सोने पिकविणारे शेतकरी सातत्याने या ना त्या कारणाने आर्थिक अडचणीत सापडत आहेत. यंदा भलेही पावसाने उशिरा सुरवात केली होती; परंतु खरीप हंगाम चांगल्याप्रकारे दिसत असतानाच निसर्गाने पुन्हा हंगामावर पाणी फेरले. वैफल्यग्रस्त बळीराजा पुन्हा आस्मानी संकटाचा बळी ठरला आहे.वातावरण बदलामुळे कापसाचा भाव पाच हजार ते साडेपाच हजार यावर स्थिरावण्याची शक्यता आहे. शासनाने केंद्र सुरू न केल्याने शेतकऱ्यांना मोठी धावपळ करावी लागतकापसाची खरेदी सुरू करण्यासंदर्भात येत्या दोन दिवसात निर्णय होणार आहे. लवकरच कापूस खरेदीसंदर्भात कार्यवाही होणार आहे. यावर्षीची परिस्थिती पाहता पाच हजार ते पाच हजार दोनशे रुपये भाव मिळण्याची शक्यता आहे.- अभिजित गुगळेसचिव, कृषी उत्पन्न बाजारसमिती महागाव

टॅग्स :cottonकापूस