पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याने खचलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 17:56 IST2019-10-29T17:55:55+5:302019-10-29T17:56:25+5:30
वादळी पावसाने कपाशी व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केली.

पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याने खचलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या
पांढरकवडा (यवतमाळ) : वादळी पावसाने कपाशी व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने तालुक्यातील आकोली (गोपालपूर) येथील एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने किटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
सतिश गुणंतराव खटाळे असे मृत शेतकºयाचे नाव आहे. सतिश खटाळे यांच्याकडे अडीच एकर शेती असून त्यांनी आपल्या शेतात कपाशी व सोयाबीनचा पेरा केला. खासगी व बँकेचे कर्ज काढून पिकांची जोपासना केली. परंतु अकाली पावसामुळे संपूर्ण पीकच उद्ध्वस्त झाले. त्यामुळे निराश होऊन त्यांनी मंगळवारी दुपारी शेतातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.