शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

विविध संकटांनी शेतकरी त्रस्त

By admin | Updated: October 22, 2014 23:26 IST

पावसाने मारलेली दडी, उभे पीक वाळून जाणे, दुबार, तिबार पेरणी आणि युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतकरी त्रस्त झाले. त्यातच शेतमाल खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नांदेपेरा : पावसाने मारलेली दडी, उभे पीक वाळून जाणे, दुबार, तिबार पेरणी आणि युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतकरी त्रस्त झाले. त्यातच शेतमाल खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या घरात जेवढा पैसा होता, तेवढा मजुरांना वाटप करण्यात गेला आहे़ त्यामुळे आता त्यांच्या घरी एक पैकाही उरला नाही़ यातच खरीप पिकांना फटका बसला. जी पिके निघाली, ती विकायची कुठे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़ शेतकरी संकटात असतानाही शेतकऱ्यांच्या मदतीला धाऊन येण्यास कुणीही पुढाकार घेतला नाही़ नेते मंडळी आत्तापर्यंत विधानसभा निवडणुकीत व्यस्त होती. निकाल लागल्यानंतर आता सर्वांना मुख्यमंत्री कोण होईल, याची चिंता लागली आहे. मात्र शेतकऱ्यांचे काय हाल होत आहे, याचे त्यांना काही देणे-घेणे नाही़आता दिवाळी सण तोंडावर आला आहे. सर्वत्र खरेदी सुरू आहे. मात्र हा सण कसा साजरा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे़ त्यातून मार्ग काढण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून आपल्या जनावरांची विक्री करण्याचा सपाटा सुरू केला आहे. आता ते जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवित आहेत. बाजारात कवडीमोल दराने जनावरे विक्री करावी लागत आहे़ ज्या जनावरांनी वर्षभर शेतकऱ्यांना साथ दिली, ती जनावरे विकताना त्यांना यातना होत आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या मनात दु:ख आहे, तर दुसरीकडे दिवाळी सण साजरा करायचा असल्यामुळे ते दुविधेत सापडले आहे. या व्दिधा मनस्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नेहमी संकटाचा सामना करावा लागतो़ पीक ऐन भरात असताना पावसाने दडी मारल्याने सोयाबिनच्या शेंगा भरल्याच नाही, तर कापसाचे पीक वाळू लागले आहे़ पिकांना लावला एवढा खर्चही निघणे अवघड झाले आहे़ (वार्ताहर)