शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
4
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
5
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
6
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
7
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
8
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
9
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
10
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
11
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
12
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
13
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
14
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
15
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
16
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
17
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
18
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
19
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
20
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीतून सावरण्यासाठी अर्ली व्हेरायटीकडे शेतकऱ्यांची धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 05:00 IST

एकूण लागवड करताना लवकरात लवकर सोयाबीनचे वाण हातात यावे आणि दुसरे पीकही लावता यावे, याकरिता शेतकऱ्यांनी अर्ली व्हेरायटीची निवड केली. आता सोयाबीनच्या दरात वाढ असली तरी संपूर्ण सोयाबीन निघाल्यानंतर सोयाबीनचे दर पुन्हा घसरतात. याचा अनुभव शेतकऱ्यांना आहे. परतीच्या पावसापासून संरक्षण मिळविण्यासाठी लावलेली अर्ली व्हेरायटी सततच्या पावसाने पुन्हा धोक्यात आली आहे. तर लांब कालावधीचे सोयाबीनही पावसाच्या फेऱ्यात अडकले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सोयाबीनची पेरणी यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यासोबतच संशोधित वाण आणि अर्ली व्हेरायटी लागवडीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले आहेत. परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी हा पर्याय निवडला होता. मात्र, निसर्गाचा लहरीपणा कायम राहिल्याने आता अर्ली आणि लांबपल्ल्याच्या वाणालाही धोका निर्माण झाला आहे. एकूण लागवड करताना लवकरात लवकर सोयाबीनचे वाण हातात यावे आणि दुसरे पीकही लावता यावे, याकरिता शेतकऱ्यांनी अर्ली व्हेरायटीची निवड केली. आता सोयाबीनच्या दरात वाढ असली तरी संपूर्ण सोयाबीन निघाल्यानंतर सोयाबीनचे दर पुन्हा घसरतात. याचा अनुभव शेतकऱ्यांना आहे. परतीच्या पावसापासून संरक्षण मिळविण्यासाठी लावलेली अर्ली व्हेरायटी सततच्या पावसाने पुन्हा धोक्यात आली आहे. तर लांब कालावधीचे सोयाबीनही पावसाच्या फेऱ्यात अडकले आहे.

शेतकरी म्हणतात...

गतवर्षी जास्त कालावधी घेणाऱ्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला होता. एकरी उत्पन्न घटल्याने सर्वाधिक लागवड अर्ली व्हेरायटीची झाली. जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांनी असे वाण लावले आहे. मीसुद्धा याच वाणाचा प्रयोग केला आहे. मात्र, पावसाने धडकी भरली आहे. - पिंटू घुले, शेतकरी

इतर पिकांपेक्षा सोयाबीनला येणारा खर्च कमी आहे. याशिवाय सोयाबीन काढल्यानंतर दुसरे पीकही घेता येते. याशिवाय मजुराची कटकट नाही. यामुळे शेतकरी सोयाबीन लागवडीकडे वळत आहे. या व्यतिरिक्त इतर पीक घेताना अधिक खर्च होतो. शिवाय, उत्पन्नही कमी येते. - अनुप चव्हाण, शेतकरी

काळानुसार बदलजिल्ह्यात सोयाबीनच्या क्षेत्रात २०१९ पर्यंत वाढ झाली. त्यानंतर हे क्षेत्र कमी झाले. आता पुन्हा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत आहे. यासोबतच शेतकरी अर्ली व्हेरायटी लागवड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बियाणे मागत आहेत. प्रत्येकांचा वेगळा अनुभव आहे. त्यानुसार लागवड झाली आहे.- नवनाथ कोळपकर, कृषी अधीक्षक

 झटपट येणारे सोयाबीन सोयाबीनमध्ये विविध संशोधित वाण बाजारात आले आहे. यामध्ये अर्ली व्हेरायटी सर्वाधिक लोकप्रिय होत आहे. झटपट हातात येणारे पीक म्हणून त्याकडे पाहिले जाते. मध्यम कालावधीत येणारे सोयाबीन अल्पावधित हाती येणाऱ्या पिकासोबतच मध्यावधीतही हाती येणारे सोयाबीनचे वाण बाजारात आले आहे. साधारणत: ९० दिवसात हे सोयाबीन निघते. जास्त कालावधीत येणारे सोयाबीन ३३५ जातीचे ११० दिवसांचे जास्त कालावधीचे आणि १२० दिवसांचे संकरित वाण बाजारात आहे. ऋतूचक्र बदलल्याने हे सर्व वाण धोक्यात आले आहे.

 

टॅग्स :agricultureशेती