शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

सडलेले पीक दाखवत शेतकऱ्यांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 6:00 AM

केंद्राच्या पथकाने शुक्रवारी नेर तालुक्यातील वटफळी, लोणी, मोझर, घारेफळ, सातेफळ शिवारात धावता दौरा केला. शेतकऱ्यांनी यावेळी प्रत्यक्ष आपल्या व्यथा मांडल्यावरील पथकातील अधिकारी मात्र शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडीमार करीत होते. त्यामुळे या पथकाला सोयाबीन, कापूस पिकाची कितपत माहिती असावी याबाबत शेतकऱ्यांनी शंका व्यक्त केली.

ठळक मुद्देकेंद्रीय पथक : नेर तालुक्यातील पाच शिवारात पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : परतीचा पावसाने झालेल्या नुकसानीची महिनाभरानंतर केंद्रीय पथकाने शुक्रवारी शेतांना भेटी देऊन पाहणी केली. नेर तालुक्यातील शेतशिवारात हे पथक पोहोचताच शेतकऱ्यांनी सडलेले सोयाबीन दाखवित मदतीसाठी आक्रोश केला.केंद्राच्या पथकाने शुक्रवारी नेर तालुक्यातील वटफळी, लोणी, मोझर, घारेफळ, सातेफळ शिवारात धावता दौरा केला. शेतकऱ्यांनी यावेळी प्रत्यक्ष आपल्या व्यथा मांडल्यावरील पथकातील अधिकारी मात्र शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडीमार करीत होते. त्यामुळे या पथकाला सोयाबीन, कापूस पिकाची कितपत माहिती असावी याबाबत शेतकऱ्यांनी शंका व्यक्त केली. वटफळी येथे दुपारी ओंकार खोब्रागडे, प्रफुल्ल गायनर, बबन केंबल, कोमल जैन, प्रशांत चौधरी आदींच्या पिकांची पाहणी केली. मागील वर्षीची मदत अजूनही मिळाली नसल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. त्यानंतर पथकाने लोणी येथील बांगर यांच्या कपाशीची पाहणी केली. नंतर हे पथक मोझर येथील राजेंद्र साखरकर यांच्या शेतात पोहोचले. त्यांनी सोयाबीनची अवस्था पथकाला सांगितल्यावरही अधिकाºयांनी पाऊस कधी आला, पेरणी कधी केली, पीक केव्हा काढले अशी चोरासारखी चौकशी सुरू केली. याबाबत सरपंच गजानन गासे, मनोहर साखरवाडे, राहुल काळे, सुरेश दानखडे, गजानन चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. कपाशीची बोंडे अतिपावसामुळे बारिक झाल्याची माहिती लोणी येथे प्रहारचे तालुका प्रमुख गोपाल चव्हाण यांनी दिल्यावरही बारिक बोंडांनी काय फरक पडतो असा उलट प्रश्न पथकातील अधिकाºयांनी विचारला.या पथकात डॉ.आर.पी. सिंह यांच्यासह विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, दारव्हा एसडीओ इब्राहीम चौधरी, एसएओ नवनाथ कोळपकर, नेरचे तहसीलदार अमोल पोवार, गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे, जिल्हा परिषद सदस्य निखील जैत, कृषी अधिकारी नामदेव कुमरे, नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुंटलावार, तलाठी भारती धांदे, एस.आर. माहुरे उपस्थित होते. जिल्ह्यातील परिस्थितीचा अहवाल पाठवून शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी सांगितले. तर केंद्रीय पाहणीचा अहवाल जाईपर्यंत शेतकरी कशाच्या आधारे जगेल असा सवाल जिल्हा परिषद सदस्य निखील जैत यांनी उपस्थित केला.सडलेल्या सोयाबीनचे मांडले दुकानघारेफळ येथे अनिल खोडे यांच्या शेतातील कपाशीची पाहणी केली. तर सातेफळ येथील शेतकºयांनी नेर बाजार समितीचे सभापती रवींद्र राऊत यांच्या नेतृत्वात सडलेले सोयाबीन व कपाशीची बोंडे रस्त्यावर आणून टाकली. यावेळी हिंमत धोटे, संतोष किरकीटे, भास्कर किरकीटे, विजय हळदे, अरुण काळे, सुमन पिसोळे, राहुल ठोंबरे, गणेश खोडे यांनी रस्त्यावर सडलेल्या सोयाबीनचे आणि कपाशीचे स्टॉल लावले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी