शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर ३.५ लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर; बँक डिटेल्स घेण्यासाठी सहकार विभागाची पाच जिल्ह्यांत शोधमोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 14:27 IST

Yavatmal : राज्य शासनाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देण्याची घोषणा केली. मात्र, ही कर्जमाफी कधी होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असताना राज्य शासनाने शेतकरी कर्ज निवारण योजनेसाठी माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

रूपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देण्याची घोषणा केली. मात्र, ही कर्जमाफी कधी होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असताना राज्य शासनाने शेतकरी कर्ज निवारण योजनेसाठी माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार, विदर्भातील तीन लाख ५३ हजार ५५१ शेतकऱ्यांकडे तीन लाख ४७ हजार ७२२ कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. अद्याप ८२ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांनी माहिती बँकांकडे सादर केलेली नाही.

शेतकरी कर्ज निवारण योजनेच्या माध्यमातून थकीत कर्जाच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून माहिती गोळा केली जात आहे. यामध्ये संबंधित शेतकऱ्यांकडे कुठल्या वर्षापासून कर्जाची थकबाकी आहे, हे कर्ज अल्पमुदती, मध्यम मुदती की दीर्घ मुदती यापैकी कुठल्या प्रकारात मोडते याचा शोध या मोहिमेतून घेतला जात आहे.

त्यासाठी शेतकऱ्यांचे आधारकार्ड, बँक पासबुक आणि इतर माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सोसायटी सचिवांकडून करण्यात येत आहे. सचिव मंडळी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन ही माहिती घेत आहेत. यानंतरही अनेक थकबाकीदार शेतकरी या मंडळींना गवसली नाहीत. यासाठी आता गावपातळीवर विशेष कॅम्प घेऊन अशा शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांच्या नेतृत्वात होत आहे. 

सहकार विभागाचे पथक गावांमध्ये धडकले

याच अनुषंगाने ते शनिवारपासून यवतमाळ जिल्ह्यात मुक्कामी आहे. गावपातळीवर जाऊन याचे वास्तव शोधून काढण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. याशिवाय या शोधमोहिमेत विविध तीन पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, देखरेख मुख्याधिकारी अजित डेहणकर आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांच्या नेतृत्वात ही टीम काम करीत आहे.

मयत, गाव सोडून गेले, योजनेची माहितीच नाही

या शोधमोहिमेत थकबाकीदार शेतकरी मृत असल्याची बाबही पुढे आली आहे. तर काही शेतकरी गाव सोडून गेले आहेत. काही शेतकरी रोजमजुरीच्या शोधात दुसऱ्या ठिकाणी काम करीत आहेत. तर काही शेतकऱ्यांना या योजनेची कुठलीही माहिती नाही.

थकबाकीदार शेतकरीजिल्हा              थकीत              रक्कमयवतमाळ       १,२९,११९          १,३३,५१३अमरावती       ७०,२५३          ७०,८३०.५९अकोला          ५५,२००          ६०,१७२.५०वाशिम           ५५,५९१          ६०,११५.६५बुलढाणा         २५,३००          २३,१००.९९एकूण           ३,३५,४६३       ३,४७,७२२.७३

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers face huge debt; Cooperative department starts search operation.

Web Summary : Maharashtra government seeks farmer debt details for loan waiver scheme. Over three lakh farmers in Vidarbha owe ₹3.47 lakh crore. Cooperative department teams are searching villages, finding deceased farmers, absentees, and those unaware of the scheme.
टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर