शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफीचा भोपळा

By admin | Updated: June 30, 2017 02:00 IST

थकबाकीदार शेतकऱ्यांसोबतच कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.

दुष्काळ वगळला : ३०९ कोटी पुनर्गठित कर्जमाफीला शेतकरी मुकणार रूपेश उत्तरवार । लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : थकबाकीदार शेतकऱ्यांसोबतच कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. प्रत्यक्षात अध्यादेशामध्ये पुनर्गठनाच्या कर्जमाफीत २०१२ पूर्वीचे पुनर्गठन वगळले. या निकषामुळे पुनर्गठन झालेले २००९ व २०१० आणि २०१० व २०११ मधील ३०९ कोटींचे कर्ज कर्जमाफीतून बाद होणार आहे. याचा फटका एक लाख शेतकऱ्यांना बसणार आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या अध्यादेशात निकषांमध्ये अनेक अडथळे निर्माण करून ठेवले. यामुळे कर्जप्रवाहातून दूर गेलेले शेतकरी पुन्हा मुख्य प्रवाहात येतील की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्हा २००० पासून सतत दुष्काळी स्थितीत आहे. त्याची शासन दप्तरी नोंद आहे. तरीही २०१२ ते २०१६ च्या दुष्काळी स्थितीचा उल्लेख अध्यादेशात नाही. या चार वर्षातील थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. याच काळातील थकीत पुनर्गठन माफ होणार आहे.या चार वर्षांच्या कालखंडपेक्षाही भीषण स्थिती २००९-२०१० आणि २०१०-२०११ च्या कालखंडात होती. त्याचाही अध्यादेशात उल्लेख नाही. यामुळे या कालखंडातील पुनर्गठीत कर्जाचे शेतकरी कर्जमाफीला मुकणार आहेत. या थकबाकीदार शेतकऱ्यांचा आकडा सर्वात मोठा आहे. २००९-२०१० मध्ये ८५ हजार शेतकऱ्यांच्या २४६ कोटी ८९ लाख रूपयांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले होते. हा आजपर्यंतच्या पुनर्गठनातील थकबाकीदार शेतकऱ्यांचा सर्वात मोठा आकडा आहे. कर्जमाफीच्या अध्यादेशात २००९-१० आणि २०१०-११ मधील दुष्काळाचा उल्लेख नाही. या काळात मोठ्या प्रमाणात पुनर्गठन झाले. हे पुनर्गठीत शेतकरी कर्जमाफीला मुकणार आहेत. जिल्हा बँक राज्य शासनाकडे याचे वास्तव मांडणार आहे.- अविनाश सिंगमसीईओ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यवतमाळ