शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक कलाहात वृद्ध पित्याच्या छातीत संतप्त मुलाने खुपसला सुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 05:00 IST

नथ्थू आसूटकर हे पत्नी व मुलासह भेंडाळा येथे राहून शेती करीत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. ते नेहमी घरी दारू पिऊन वाद करीत असत. बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ते घरी आले. या वेळी मुलगा वैभव याच्यासोबत त्यांचा वाद झाला. या वादात संतापलेल्या वैभवने धारदार सुरा भोसकून नथ्थु आसूटकर यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर उपचारासाठी त्यांना वणीतील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

ठळक मुद्देझरी तालुक्यात निर्घृण खून : मारेकरी मुकुटबन पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कमुकुटबन : कौटुंबिक कलहातून संतापाच्या भरात मुलाने पित्याच्या छातीत सुरा भोसकून त्यांची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास झरी तालुक्यातील भेंडाळा येथे घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुकुटबन पोलिसांनी मारेकरी मुलाला गुरुवारी सकाळी अटक केली. नथ्थु केशव आसूटकर (४८) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मारेकरी मुलगा वैभव नथ्थु आसूटकर याच्याविरुद्ध पोलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मृत नथ्थु आसूटकर यांना दोन मुली व एक मुलगा आहे. त्यापैकी एका मुलीचे लग्न झाले असून, दुसरी शिक्षणासाठी भद्रावती येथे राहत होती. नथ्थू आसूटकर हे पत्नी व मुलासह भेंडाळा येथे राहून शेती करीत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. ते नेहमी घरी दारू पिऊन वाद करीत असत. बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ते घरी आले. या वेळी मुलगा वैभव याच्यासोबत त्यांचा वाद झाला. या वादात संतापलेल्या वैभवने धारदार सुरा भोसकून नथ्थु आसूटकर यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर उपचारासाठी त्यांना वणीतील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, प्रकरण अंगलट येईल म्हणून नथ्थु आसूटकर यांचा मृतदेह वणीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा बहाणा करून थेट भेंडाळ्यात आणण्यात आला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची कुणकुण मुकुटबन पोलिसांना लागली. लगेच पोलिसांनी भेंडाळा येथे जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. तसेच वैभवलाही पोलीस ठाण्यात आणले. मृताचा भाऊ जगन केशव आसूटकर यांच्या तक्रारीवरून गुरुवारी सकाळी ७ वाजता वैभवला अधिकृत अटक करून त्याच्याविरुद्ध भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी भेंडाळा येथे घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा तपास ठाणेदार धर्माजी सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड व जितेश पानघाटे करीत आहेत.

सलग दुसरी घटना  मुलाने वृद्ध पित्याचा खून केल्याची घटना बुधवारी पारवा ता. घाटंजी येथे घडली. या घटनेची वार्ता ताजी असतानाच बुधवारीच रात्री झरी तालुक्यातील भेंडाळा गावातही वृद्ध पित्याला पोटच्या मुलाने ठार केले. सलग घडलेल्या या दोन घटनांनी जिल्हा हादरला आहे.  

 

टॅग्स :Deathमृत्यूArrestअटक