शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

By admin | Updated: May 2, 2017 00:05 IST

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहे. शेतीला जोडव्यवसायाची साथ देवून क्लस्टर आधारित योजना नव्याने सुरू होत आहे.

महाराष्ट्र दिन : शेतकऱ्यांना पुढे नेण्यासाठी लोकसहभाग आवश्यकयवतमाळ : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहे. शेतीला जोडव्यवसायाची साथ देवून क्लस्टर आधारित योजना नव्याने सुरू होत आहे. या योजना राबवितानाच शेतकऱ्यांना सक्षमपणे पुढे नेण्यासाठी लोकसहभागही आवश्यक आहे, असे पालकमंत्री मदन येरावार यांनी सांगितले.महाराष्ट्र दिनानिमित्त येथील पोस्टल मैदानावर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. यावेळी ते बोलत होते. प्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, नगराध्यक्ष कांचन चौधरी यांच्यासह लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक उपस्थित होते.सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सेवा हमी कायदा आणल्याने कालमर्यादेत कामे होवू लागली आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्ह्याचे रबी क्षेत्र दुपटीने वाढले. यवतमाळ शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ३०२ कोटीची योजना मंजूर झाली. सांडपाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी १४५ कोटींची अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना मंजूर झाली असून, लवकरच ती कार्यान्वित होईल. धडक सिंचन विहिरी योजनेंतर्गत अतिरिक्त विहिरी मंजूर झाल्या आहेत. वीज जोडण्यासाठी १५५ कोटी उपलब्ध होत आहे. फिडर विलगीकरणासाठीही ७५ कोटींचा प्रस्ताव आहे. मार्च २०१८ पर्यंत मागेल त्याला २४ तासात वीज कनेक्शन दिले जातील. यवतमाळात अंडरग्राऊंड वीज वाहिनीचे काम सुरु झाले असून पुसद, वणी, पांढरकवडा, उमरखेड येथेही असे प्रस्ताव तयार केल्या जात आहे. राज्यात सौर उर्जेचे तीन प्रकल्प उभारले जात असून, त्यातील एक प्रकल्प अकोलाबाजारजवळ मांजर्डा येथे उभा राहत आहे. रेल्वे मार्गाचे भूसंपादन गतीने सुरू आहे. थेट खरेदीने चार पटीपेक्षा मोबदला शेतकऱ्यांना दिला जात आहे. समृध्दी महामार्ग शेतकऱ्यांच्या मालाला चांगली बाजारपेठ मिळून देण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे ना.येरावार म्हणाले. शेतकऱ्यांना शेतीत विविध प्रकारच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांचीही माहिती त्यांनी दिली. तूर खरेदीसाठी बाजार हस्तक्षेप योजना राबविण्यात येत आहे. खरेदीसाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. खरेदीच्या नावावर व्यापार होवू दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी टिपेश्वर, पैनगंगा, सहस्त्रकुंड, चिंतामणी देवस्थान कळंब, संकटमोचन ही स्थळे विकसित होत असून यासाठी निधी मंजूर झाला असल्याचे ना. मदन येरावार यांनी यावेळी सांगितले.ध्वजारोहनानंतर पोलीस व विविध दलाच्यावतीने पथसंचलन करून मानवंदना देण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. (वार्ताहर)