शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील तलावाला अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:00 IST

पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यावर दोन्ही बाजूने अतिक्रमण वाढले आहे. यामुळे नाल्याची नाली झाली आहे. यातून पावसाळ्यात सखल भागात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे शहरातील मुबलक पाण्याच्या विहिरीही दुर्लक्षित धोरणाने बुजविल्या गेल्या आहेत, तर अनेक ठिकाणी मूर्तीचे विसर्जन करून पाण्याचे प्रवाह प्रभावित झाले आहे.

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील सर्व सांडपाणी वाहून तलावफैलातील तलावात गोळा होते. या तलावाला आणि तलावातील पाण्याला सुरक्षित करण्यासाठी साैंदर्यीकरणाची योजना हाती घेण्यात आली. योजना अर्ध्यावरच थांबली. पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यावर दोन्ही बाजूने अतिक्रमण वाढले आहे. यामुळे नाल्याची नाली झाली आहे. यातून पावसाळ्यात सखल भागात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे शहरातील मुबलक पाण्याच्या विहिरीही दुर्लक्षित धोरणाने बुजविल्या गेल्या आहेत, तर अनेक ठिकाणी मूर्तीचे विसर्जन करून पाण्याचे प्रवाह प्रभावित झाले आहे.

हे घ्या पुरावे !

शहरातील तलावफैल परिसरात पूर्वी एक प्राचीन विहीर होती. या विहिरीवर आत्महत्येचे प्रमाण अधिक वाढल्याने ती बुजविण्यात आली. आता याठिकाणी देवीचे मंदिर आहे.

प्राचीन मंदिराच्या मागील बाजूला मुबलक पाण्याची विहीर आहे. या ठिकाणावरून शहराला पाणीपुरवठा होत होता. या ठिकाणी मूर्ती विसर्जन झाल्याने ही विहीर असुरक्षित झाली आहे.

शहरातील पाणी साठविणाऱ्या तलावात जाणारा पाण्याचा प्रवाह अतिक्रमणामुळे प्रभावित झाला आहे. नाल्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण झाल्याने नाली तयार झाली आहे.

नाल्याच्या सुरक्षा भिंतीचं काम अर्ध्यावरच

- शहरातील अतिक्रमणाला रोखण्यासाठी नाल्याच्या काठावर सुरक्षा भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. - मात्र, ही सुरक्षा भिंत अर्ध्यावरच सोडून देण्यात आली. नाल्यामध्ये उपसलेला गाळ तसाच ठेवण्यात आला आहे. यातून नाल्या अरूंद झाल्या आहेत.

पालिका प्रशासन बिनधास्तयवतमाळ शहरातील नाल्याच्या काठावर वाढणाऱ्या अतिक्रमणाच्या बाबतीत नगर परिषद प्रशासन बिनधास्त आहे. दोन्ही बाजूने अतिक्रमण झाल्याने नाल्यातून पाण्याचा प्रवाह पुढे जाताना अडचणी येत आहेत. याशिवाय अनेक झुडुपेही सुरक्षा भिंतीवर वाढले आहे. या सर्व बाबीकडे दुर्लक्ष झाले आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष अन्‌ राजकारण...

नैसर्गिक प्रवाह जोपासणे काळाची गरज आहे. हे प्रवाह दूषित झाले तर त्याचा परिणाम सर्वांवरच होणार आहे. यामुळे प्रवाहाला दूषित होण्यापासून संरक्षित केले पाहिजे. याशिवाय वृक्षांची लागवड करून पर्यावरण समृद्ध केले पाहिजे. - डाॅ. विजय कावलकर

शहरातील वाढत्या अतिक्रमणाला प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. याशिवाय, राजकारणातूनही अतिक्रमणाकडे दुर्लक्ष झाले आहे. पर्यावरण संवर्धन करण्यासोबतच अतिक्रमण मुक्त करण्याचं कामही प्रशासनाचं आहे. त्यादृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे.- निखिल राऊत

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण