शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अकरावी प्रवेशाच्या जागा शंभर टक्के भरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 05:00 IST

प्रत्यक्षात जिल्ह्यात ११ वीचे वर्गही सुरू करण्यात आले आहे. शहरी भागातील महाविद्यालयांची जेवढी मंजूर ‘इनटेक कॅपेसिटी’ आहे, तेवढे विद्यार्थी प्रवेशित झाले आहे. ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांची देखील परिस्थिती अशीच आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये मंजूर जागांपेक्षा कमी प्रवेश झाल्याचे वास्तव आहे. मात्र यंदाच्या प्रवेश संख्येबाबत अद्याप शिक्षण विभागाने प्रत्यक्ष पडताळणी केलेली नाही. ती झाल्यावरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. 

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची चिंताच मिटली : दहावी उत्तीर्णांपेक्षा अधिक जागा

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात यंदाही अकरावीची प्रवेशप्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात आली. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे सुरुवातीला महाविद्यालय स्तरावरून विद्यार्थ्यांना लिंक पाठवून ऑनलाइन अर्ज मागविले होते. प्रत्यक्षात जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या अकरावीच्या सर्व जागा भरल्या असून अद्यापही उरलेल्या काही विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.यंदा जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेतून एकंदर ३६ हजार ७७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्यासाठी अकरावीच्या विज्ञान, कला, वाणिज्य शाखांच्या तब्बल ३९ हजार ७६० जागा उपलब्ध आहेत. शिवाय एमसीव्हीसीच्याही अडीच हजार जागा आहेत. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही.प्रत्यक्षात जिल्ह्यात ११ वीचे वर्गही सुरू करण्यात आले आहे. शहरी भागातील महाविद्यालयांची जेवढी मंजूर ‘इनटेक कॅपेसिटी’ आहे, तेवढे विद्यार्थी प्रवेशित झाले आहे. ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांची देखील परिस्थिती अशीच आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये मंजूर जागांपेक्षा कमी प्रवेश झाल्याचे वास्तव आहे. मात्र यंदाच्या प्रवेश संख्येबाबत अद्याप शिक्षण विभागाने प्रत्यक्ष पडताळणी केलेली नाही. ती झाल्यावरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. 

शिक्षक संख्येवर परिणाम नाहीजिल्ह्यात अकरावीच्या तुकड्या असलेले ३२२ महाविद्यालये आहेत. मात्र, सर्वच महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या जागा भरल्या गेल्या आहेत. त्यामुळे संचमान्यतेचा प्रश्न निर्माण होऊन शिक्षक संख्या कमी होण्याची शक्यता नसल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.

मागील वर्षाची स्थितीयंदाप्रमाणेच मागील वर्षीही उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा अकरावीच्या जागा अधिक होत्या. यंदा संपूर्ण जागा भरल्या असून काही दिवसांपूर्वी ज्यांनी आयटीआयला अर्ज टाकला मात्र आता आयटीआयला नंबर लागला नाही, असे विद्यार्थी आता अकरावी प्रवेशासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांनाही प्रवेश दिला जात आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र