शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

शाळांचे वीज बिल ग्रामपंचायतीच्या खांद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 06:00 IST

अनेक शाळांनी वीज बिल न भरल्याने त्यांचा वीज पुरवठा वीज कंपनीने खंडित केला आहे. दुसरीकडे, शासनाने शाळांचे अनुदान कपात केले आहे. अवघे पाच हजारांचे वार्षिक अनुदान दिले जात आहे. सादिल वेळेत उपलब्ध होत नाही. त्यामुळे शाळेचे बिल थकत आहे. अनेक शाळांचा वीज पुरवठा तोडण्यात आला आहे.

ठळक मुद्देडिजिटल पेच : १४ व्या वित्त आयोगातून खर्चासाठी जिल्हा परिषद सभापती आग्रही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एकीकडे लोकसहभागातून जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल झाल्या. तर दुसरीकडे या शाळांकडेवीज बिल भरण्याचे पैसेच नाही. त्यामुळे डिजिटल साहित्य धूळखात पडले आहे. ही स्थिती बदलण्यासाठी शाळांचे वीज बिल ग्रामपंचायतींनी भरावे, अशा सूचना शिक्षण सभापतींनी केल्या आहेत.ज्ञानरचनावाद, डिजिटल अध्यापनाची साधने आदींमुळे खेड्यातील शाळांची भूमिका आता बदलत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी शिक्षकांनी गावकऱ्यांकडून वर्गणी मिळवून शाळेत अत्याधुनिक साहित्य आणले. टीव्ही, संगणक, प्रोजेक्टर असे साहित्य आले आहे. मात्र त्यांचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शाळेत वीजपुरवठ्याची गरज आहे.अनेक शाळांनी वीज बिल न भरल्याने त्यांचा वीज पुरवठा वीज कंपनीने खंडित केला आहे. दुसरीकडे, शासनाने शाळांचे अनुदान कपात केले आहे. अवघे पाच हजारांचे वार्षिक अनुदान दिले जात आहे. सादिल वेळेत उपलब्ध होत नाही. त्यामुळे शाळेचे बिल थकत आहे. अनेक शाळांचा वीज पुरवठा तोडण्यात आला आहे. या विरुद्ध शिक्षकांनी जिल्हा परिषदेकडे वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळाली नव्हती. अखेर शिक्षण सभापती कालिंदा पवार यांनी स्थायी समितीमध्ये हा विषय प्रकर्षाने मांडला. गावातील शिक्षण, आरोग्य, स्वच्छता अशा जबाबदाºया पाहणाºया ग्रामपंचायतींनी शाळेचे वीज बिल भरावे, अशी मागणी सीईओंकडे करण्यात आली आहे.ग्रामपंचायत अधिनियमात तरतूदशाळांमधील ‘अंधार’ दूर करण्यासाठी शिक्षण सभापती कालिंदा पवार यांनी ग्रामपंचायत अधिनियमाचा आधार घेतला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये ग्रामपंचायतीने कोणत्या बाबीवर खर्च करावा, हे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यात कलम ४५ नुसार ग्रामसूचीमधील शिक्षणविषयक बाबींवर खर्च करण्याची तरतूद करण्यात आली आहे. हीच बाब सभापतींनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.ग्रामपंचायतींनी १४ व्या वित्त आयोगातून शाळेचे बिल भरण्याबाबत आदेश द्यावे, अशी विनंती सीईआेंना केली आहे. लवकरच असे निर्देश देण्याचे त्यांनी मान्य केले आहे.- कालिंदा पवार, शिक्षण सभापती, जिल्हा परिषद यवतमाळ

टॅग्स :electricityवीजSchoolशाळा