शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच दिवशी एसटीत बसले आठ हजार प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:00 IST

तब्बल पाच महिन्यानंतर परजिल्ह्यातील बसफेऱ्या गुरूवारी सुरू झाल्या. यामुळे सकाळपासूनच बसस्थानकावर प्रवाशांची वर्दळ पहायला मिळाली. बसस्थानकाबाहेर वाहक प्रवाशांना बोलविण्याचे काम करीत होते. तासभरानंतर वाहन भरले जात होते. यानंतर बस निघत होती. बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची नोंद घेतली जात होती. याशिवाय प्रवासी सोशल डिस्टन्स पाळत मास्कचाही वापर करताना दिसून आले.

ठळक मुद्दे१२९ कर्मचारी कर्तव्यावर : ३२६ बसफेऱ्या आणि चार लाखांचे उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बहुप्रतीक्षेनंतर गुरुवारी सुरू झालेल्या एसटीला पहिल्याच दिवशी आठ हजार प्रवासी मिळाले. दिवसभरात ३२६ बसफेऱ्या झाल्या. यातून महामंडळाला चार लाखांचे उत्पन्न मिळाले.तब्बल पाच महिन्यानंतर परजिल्ह्यातील बसफेऱ्या गुरूवारी सुरू झाल्या. यामुळे सकाळपासूनच बसस्थानकावर प्रवाशांची वर्दळ पहायला मिळाली. बसस्थानकाबाहेर वाहक प्रवाशांना बोलविण्याचे काम करीत होते. तासभरानंतर वाहन भरले जात होते. यानंतर बस निघत होती.बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची नोंद घेतली जात होती. याशिवाय प्रवासी सोशल डिस्टन्स पाळत मास्कचाही वापर करताना दिसून आले. या ठिकाणी निमआराम बसेसही सोडण्यात आल्या.गुरुवारी यवतमाळ आगारात ५२ फेऱ्या झाल्या. या ठिकाणी १३९७ प्रवाशांची नोंद करण्यात आली. पुसद आगारात ५० फेऱ्या झाल्या. १२३४ प्रवासी मिळाले. वणीतील फेऱ्यांची संख्या १४ पर्यंतच मर्यादित होती. ३६४ प्रवासी या ठिकाणी होते. उमरखेडमध्ये ४६ फेऱ्या झाल्या. १२८० प्रवाशांनी या ठिकाणी प्रवास केला. दारव्हा आगारात ५६ फेऱ्या झाल्या. १३२२ प्रवाशांनी या ठिकाणी प्रवास केला. पांढरकवडा आगारात २१ फेऱ्या झाल्या. या ठिकाणी ६९० प्रवाशांनी प्रवास केला. नेर आगारात ३९ बसफेऱ्या झाल्या. १०५८ प्रवाशांची या ठिकाणी नोंद झाली. दिग्रस आगारात २४ बसफेऱ्या झाल्या, ५४७ प्रवाशांची या ठिकाणी नोंद करण्यात आली. राळेगाव आगारात २४ बसफेऱ्या झाल्या. या ठिकाणी ४१० प्रवाशांची नोंद करण्यात आली.पहिल्याच दिवशी तीन लाख ९९ हजार २३८ रूपयांचे उत्पन्न महामंडळाला मिळाले. पुढे ही संख्या वाढण्याचा अंदाज एसटी विभागाचे डीटीओ राठोड यांनी व्यक्त केला.

टॅग्स :state transportएसटी